HomeEntertainmentइतके आलिशान आहे स्वप्नील जोशीचे घर, घरापुढे फिका पडेल राजमहाल...पहा घराचे आतले...

इतके आलिशान आहे स्वप्नील जोशीचे घर, घरापुढे फिका पडेल राजमहाल…पहा घराचे आतले फोटो…

रामानंद सागरची लव-कुश सिरीयलतर तुम्हाला चांगलीच माहिती असेल. हि सिरीयल १९८६ मध्ये टीव्हीवर प्रसारित होण्यास सुरुवात झाली होती. सिरीयलमध्ये कुशची भूमिका मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने साकारली होती. सिरीयलमधून स्वप्नील जोशीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. स्वप्नील जोशी मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे.
त्यानंतर १९९३ मध्ये रामानंद सागरच्या कृष्णा सिरीयलमध्ये देखील तो पाहायला मिळाला होता. ज्यामध्ये त्याने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. सिरीयलमधील त्याची श्रीकृष्णाची भूमिका देखील दर्शकांना खूपच आवडली होती. यानंतर स्वप्नील घराघरात ओळखला जाऊ लागला.
आज देखील स्वप्नील जोशीला कृष्ण म्हणूनच ओळखले जाते. त्यानंतर तो अनेक मराठी चित्रपट आणि सिरियल्समध्ये पाहायला मिळाला. स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी झाला होता. २००५ मध्ये त्याने अपर्णा जोशीसोबत लग्न केले पण त्याचे हे लग्न फरक काळ टिकले नाही आणि २००९ दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले.
यानंतर त्याने आराध्यासोबत दोसरे लग्न केले ज्यानंतर त्यांना दोन मुले झाली. स्वप्नीलने मुंबईच्या बैराम जिजाबाई शाळेमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर त्याने सिडनहॅम कॉलेजमधून बी.कॉमची पदवी घेतली. स्वप्नीलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या सिरीयलमध्ये काम करताना पाहायला मिळत आहे शिवाय नुकतेच त्याचा वाळवी चित्रपट दर्शकांच्या भेटीला आला होता हा चित्रपट सुपरहिट ठरला. येणाऱ्या काळामध्ये तो सुटका या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts