मुंबईच्या बांद्राच्या ज्या आलिशान फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूत राहायचा तिथे नवीन भाडेकरू येणार आहे. दिवंगत अभिनेता या फ्लॅटमध्ये रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिथानी आणि हाऊस हेल्पर नीरज आणि केशव सोबत राहायचा. २०२० मध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर हा फ्लॅट रिकामा पडला होता.
सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला जवळ जवळ अडीच पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या निधनानंतर त्याचा बांद्रा येथील फ्लॅट देखील खूप चर्चेत आला होता. येत्या काही दिवसांपासून या फ्लॅटच्या आलिशान खोल्यांबाबत तपासणी होत होती. आता या फ्लॅटमध्ये लवकरच नवीन भाडेकरू राहायला येणार आहे. सुशांत ३ वर्षांसाठी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता.
सुशांत सिंह राजपूतचे चाहते आज देखील त्याची आठवण काढतात. बांद्राच्या वेस्ट कार्टर रोडवर असलेल्या या फ्लॅटचे मालक अनिवासी भारतीय आहेत, म्हणजेच ते मुंबईत राहत नसून परदेशात राहतात. माहितीनुसार अनेक दिवस रिकाम्या पडलेल्या या फ्लॅटला ते रेंटवर देऊ इच्छितात. मुंबईच्या रिअल इस्टेट ब्रोकर रफिक मर्चंटने सानितले होते कि फ्लॅटच्या मालकाने काही महिन्यांपूर्वी त्याच्याशी संपर्क साधला होता.
इच्छुक पार्टीसोबत बोलणे झाल्यानंतर लवकरच डील फायनल करण्यात येणार आहे. नवीन भाडेकरूला या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी तब्बल ५ लाख रुपये भाडे द्यावे लागणार आहे. इतकेच नाही तर फ्लॅटच्या मालकाला ३० लाख रुपये सिक्योरिटी डिपॉजिट देखील द्यावी लागेल.
माहितीनुसार रफिकने सांगितले कि आम्हाला कोणीतरी या फ्लॅटसाठी संपर्क केला आहे. बोलणी फायनल स्टेजवर आहे. येणारा भाडेकरू हा सुशांत सिंहच्या डेथ मुळे चिंतीत नाही त्यांचे म्हणणे आहे कि या घटनेला आता बराच काळ झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलताना रफिकने म्हंटले होते कि लोक या फ्लॅटमध्ये येण्यास घाबरतात. भाडेकरूला या फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू ज्याल्याचे कळताच ते पुन्हा इकडे फिरकत देखील नाहीत.