बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची नुकतीच बर्थ एनिवर्सरी झाली आहे. दिवंगत अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त बहिण श्वेता सिंह कीर्तीने त्याच्या आठवणीमध्ये एक भावूक नोट लिहिली आहे त्याचबरोबर आपल्या मुलांसोबत सुशांत सिंह राजपूतचे न पाहिलेले फोटो देखील शेयर केले आहेत. सुशांत २०२० मध्ये मुंबईच्या बांद्रामध्ये आपल्या घरी मृतावस्थेत आढळला होता.
सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने आपला दिवंगत भाऊ सुशांतच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आठवणीमध्ये इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या मुलांसोबतचे दिवंगत अभिनेत्याचा एक न पहिलाला फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये श्वेताची मुलगी सुशांतच्या गालावर कीस करताना दिसत आहेत. फोटोमध्ये सुशांतचा भाचा देखील दिसत.
क्युट थ्रोबॅक फोटो शेयर करत श्वेताने इमोशनल नोट देखील लिहिली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझा गोड भाऊ… तू जिथे असशील तिथे नेहमी खुश राहशील. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. कधी कधी तुला खाली पाहायला हवे आणि हे बघायला हवे तू खाली किती जादू केली आहेस. माझ्या बाळा मला नेहमीच तुझ्यावर गर्व आहे.
श्वेता सिंहने एक व्हिडीओ देखील शेयर केला आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे कि लहानपणी त्याला किती अभिनयाची आवड होती. श्वेताने म्हंटले कि माझ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त मी त्याला काही आठवणी शेयर करू इच्छिते आणि जेव्हा आम्ही दोघे लहान होतो तेव्हा कसे होतो. श्वेताने सांगितले कि आम्ही एक वर्षाच्या अंतराने जन्मलो होतो आणि संपूर्ण कुटुंब त्यांना गुड़िया गुलशन म्हणून बोलवायचे. तिने हे देखील म्हंटले कि घरामध्ये जे स्वीट्स असायचे ते आम्ही एकत्र खात होतो आणि एंजॉय करत होतो.
श्वेताने सांगितले कि जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी सर्वजण झोपायचे तेव्हा आम्ही दोघे मिळून अभिनय करत होतो. आम्ही दोघे गॅरेजमध्ये खेळायचो. याशिवाय सुशांतची दुसरी बहीण प्रियांकानेही लोकांना भावाचा जन्म दिवस खास बनवण्याचे आवाहन केले आहे. सुशांतच्या बहिणीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त डॉग शेल्टर देणगी देण्याची विनंती केली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram