HomeCricket'सामन्याच्या फक्त १ दिवस आधी मी पत्नीसोबत...', सूर्यकुमार यादवने केला खुलासा...

‘सामन्याच्या फक्त १ दिवस आधी मी पत्नीसोबत…’, सूर्यकुमार यादवने केला खुलासा…

भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विस्फोटक फलंदाजी करून २९ चेंडूमध्ये ६९ धावा बनवल्यानंतर खूपच चर्चेमध्ये आला होता. २०२२ मध्ये टी२० मध्ये सर्वात जास्त धावा बवणारा तो खेळाडू बनला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा देखील जास्त धावा त्याने बनवल्या. पण तुम्हाला सूर्यकुमारच्या लव्ह स्टोरीबद्दल माहिती आहे का, ती खूपच रंजक आहे.

सूर्याची पत्नी देविशा शेट्टीची भेट त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये झाली होती. यानंतर पाच वर्षे एकमेकांना डेट केले, यानंतर त्यांनी विवाह केला. सूर्या म्हणतो कि माझ्या चांगल्या फलंदाजीचे श्रेय मी माझ्या पत्नीला देतो. तो माझ्या सपोर्टमध्ये नेहमी उभी राहते.

१४ सप्टेंबर रोजी सूर्याने आपला ३२ वाढदिवस साजरा केला आहे. सूर्याच्या क्रिकेट जर्नीसोबत त्याची लव्ह स्टोरी देखील रंजक आहे. सूर्यकुमार यादवच्या कॉलेज लव्ह स्टोरीबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. सूर्याची पत्नी देविशा शेट्टीचा जन्म १९९३ मध्ये मुंबईमध्ये झाला होता. २०१३-१५ पर्यंत त्यांनी एक एनजीओ द लाइटहाउस प्रोजेक्टसाठी वॉलंटियर म्हणून काम केले होते.

देविशा शेट्टीला डांसची खूप आवड आहे. कॉलेजच्या एका प्रोग्राममध्ये देविशाला डांस करताना पाहून सूर्या तिच्यावर फिदा झाला होता, तिथूनच दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. सूर्यकुमारने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि तो सामन्याच्या दोन दिवस अगोदर तो बॅटला हातही लावत नाही. सामन्याच्या एक दिवस आधी तो सुट्टीचा वेळ घालवतो. यादरम्यान तो पत्नीसोबत वेळ घालवतो आणि क्रिकेटबद्दल अजिबात बोलत नाही.

एका मुलाखतीदरम्यान सूर्यकुमारला विचारले गेले होते कि सामन्याच्या ठीक एक दिवस अगोदर तू कोणता गेम प्लान करतोस. तू नेटमध्ये कसून सराव करतोस का आणि कोणत्या रणनीतीवर काम करतोस. सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी इंस्टाग्राम खूपच सक्रीय राहतात आणि त्यांच्या द्वारे शेयर केलेले फोटोज चाहत्यांना खूपच जास्त पसंद येतात. सूर्यकुमार यादवची टी२० वर्ल्ड कप २०२२ साठी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts