HomeCricketहॉटेल रूमचा पासवर्ड विसरला सूर्यकुमार यादव, पुन्हा असा मिळवला पासवर्ड, MI ने...

हॉटेल रूमचा पासवर्ड विसरला सूर्यकुमार यादव, पुन्हा असा मिळवला पासवर्ड, MI ने शेयर केला मजेदार व्हिडीओ…

आयपीएल २०२३ चा पहिला सामना ३१ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. टूर्नामेंटच्या सुरुवातीला आता फक्त काहीच दिवस उरले आहेत. आयपीएलच्या १६ व्या सीजनपूर्वी सर्व खेळाडू आपापल्या फ्रँचायझींमध्ये सामील होत आहेत. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव देखील त्याच्या फ्रँचायझीमध्ये सामील झाला आहे. यादरम्यान मुंबई इंडियंसकडून एक मजेदार शेयर केला गेला आहे ज्यामध्ये तो आपल्या हॉटेलच्या रूमचा पासवर्ड विसरल्याचे दिसत आहे.

व्हिडीओमध्ये पाहू शकता कि सूर्या आपल्या रूमकडे येतो आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. पण दरवाजा उघडत नाही. दरवाजामधून आवाज येतो एक्सेस डिनाइड. पासवर्ड पाहिजे. हे ऐकल्यानंतर सूर्य पासवर्ड म्हणून अनेक बॉलीवूड चित्रपटांमधील डॉयलॉग बोलतो पण दरवाजा उघडत नाही.

सूर्य शेवटी पासवर्ड म्हणून सुपला शॉट म्हणतो आणि त्याने हे बोलताच दरवाजा उघडतो. मुंबईकडून हा व्हिडीओ शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि पासवर्ड खूपच ग्रेट, आठवणीत आला लेट. या व्हिडीओ आतापर्यंत ११ लाख पेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे तर जवळ जवळ ८ हजर लोकांनी यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडीओवर विराट कोहली पासून शिखर धवन पर्यंत अनेक खेळाडूंनी कमेंट केली आहे. कोहलीने एक हसणारा इमोजी कमेंट केला आहे. याशिवाय शिखर धवनने देखील हसणारा इमोजी कमेंट केला आहे. दोन्ही खेळाडूंना सूर्याची अभिनय खूपच पसंद आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts