बॉलीवूडचा हीमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेद्रचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांची पर्सनल लाईफतर चर्चेमध्ये राहिली पण त्याचबरोबर प्रोफेशनल लाईफचे देखील खूप किस्से आहेत. आज आपण धर्मेंद्रचा असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत जो आज का गुंडा चित्रपटाच्या शुटींगवेळी झाला होता.
या चित्रपटामध्ये धर्मेंद्र मुख्य भूमिकेमध्ये होते आणि चित्रपट निर्माता कांतिलाल शाह याचे दिग्दर्शक होते. कांतिलाल शाह त्यांच्या काळातील बी ग्रेड चित्रपटासाठी प्रसिद्ध होते. तथापि आज का गुंडा एक मसाला चित्रपट होता. एक दिवस चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एका सीनसाठी कांतिलाल शाहने धर्मेंद्रच्या छातीवर तेल लावून घोडेस्वारीचा सीन शूट करायला लावला, पण कांतीलाल शाह त्यांना असे का करायला लावत आहेत हे त्यांना कळले नाही.
वास्तविक धर्मेद्रच्या बॉडी डबलसोबत एक रेप सीन शूट केला गेला होता आणि नंतर तो सीन धर्मेंद्रच्या घोडेस्वारीच्या सीनसोबत मिक्स करून चित्रपटामध्ये सामील केला गेला होता. यानंतर चित्रपटाच्या युनिटच्या एका मेम्बरने सनी देओलला सांगितले कि त्यांचे वडील अडल्ट चित्रपटामध्ये काम करत आहेत. सनीला यावर खूप राग आला आणि त्याने कांतिलाल शाह भेटण्यासाठी बोलावले.
सनी कांतिलाल शाहकडून जाणून घ्यायचे होते कि त्याच्या वडिलांना अडल्ट चित्रपटामध्ये का कास्ट केले. सनीला इतका राग आला कि त्याने शाहला खूपच दरडावून बोलले त्याने शाहला थप्पड देखील मारली होती. त्याचबरोबर चित्रपटाचे शुटींग थांबवण्यास सांगितले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी धमकी दिली गेली. तिकडे धर्मेंद्र खूपच दुखी झाले होते कि कांतिलाल शाहवर विश्वास ठेऊन चूक केली होती आणि त्यांच्या फिल्मी करियरवर या सीनमुळे मोठा डाग लागला असता.