HomeBollywoodइतक्या आलिशान फार्म हाऊसमध्ये सुट्ट्या घालवतो सुनील शेट्टी, आतून एखाद्या राजवाड्यापेक्षा ...

इतक्या आलिशान फार्म हाऊसमध्ये सुट्ट्या घालवतो सुनील शेट्टी, आतून एखाद्या राजवाड्यापेक्षा देखील सुंदर आहे फार्म हाऊस…पहा फोटोज…

सुनील शेट्टीचे पूर्ण नाव सुनील वीरप्पा शेट्टी आहे. १९९२ मध्ये त्याने बलवान चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. जवळ जवळ १०० पेक्षा देखील जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या सुनील शेतीने मोठ्या पडद्यावर सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. अॅक्शन आणि रोमँटिक भूमिकांव्यतिरिक्त सुनील शेट्टीएन कॉमेडीमध्ये देखील हात अजमावला आणि तिथे देखील तो सफल झाला. अंत, गोपी किशन, कृष्णा, रक्षक, बॉर्डर, भाई, हेराफेरी सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या सुनील शेट्टीची लाईफ खूपच आलिशान आहे.

९० च्या दशकामध्ये सुपरस्टार राहिलेला सुनील शेट्टी आता चित्रपटांमध्ये खूपच कमी सक्रीय आहे. तथापि त्याच्या मुलीने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. हे तर सर्वांना माहिती आहे. सुनील शेट्टी एक व्यावसायिक देखील आहे. त्याच्याजवळ अनेक आलिशान बंगले रेस्टॉरंट, कार्स आणि फार्म हाऊस आहेत.

सुनील शेट्टीचा खंडाळा येथे एक अलिशान फार्म हाऊस आहे. सुनील शेट्टी नेहमी आपल्या कुटुंबासोबत इथे वेळ घालवत असतो. सुनील शेट्टीची पत्नी देखील एक व्यावसायिक आहे आणि ती पतीच्या व्यवसायामध्ये मदत करते. आज आम्ही तुम्हाला सुनील शेट्टीच्या आलिशान फार्म हाऊसचे फोटो दाखवणार आहोत. ६२०० चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या भव्य फार्महाऊसमध्ये खाजगी बाग, स्विमिंग पूल, दुहेरी उंचीची लिव्हिंग रूम, ५ बेडरूम, स्वयंपाकघर आहे.

फार्महाऊसमध्ये आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टी उपलब्ध आहेत. त्याच्या फार्महाऊसचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला ते एखाद्या आयलँड सारखे वाटेल. सुनील शेट्टीच्या हे फार्महाऊस नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य पाहता येते.

सुनील शेट्टीने आपल्या करियरमध्ये जवळ जवळ ११० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले सुनील शेट्टी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजून देखील सक्रीय आहे. सुनील शेट्टीने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी १९९१ मध्ये माना शेट्टीसोबत लग्न केले होते. सुनील आणि मानाने जवळ जवळ ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते.

सुनील शेट्टीने इंडस्ट्रीशिवाय हॉटेल इंडस्ट्रीमध्ये देखील खूप नाव कमवले आहे. सुनील सध्या आपला बहुतेक वेळ व्यवसायात घालवतो. फार्महाऊसला जास्तीत जास्त ओपन ठेवण्यात आले आहे. याशिवाय पूल स्पेसदेखील खूप जास्त आहे. सुनीलची पत्नी मानाची इंटीरियर डिजाइनिंग आणि आर्किटेक्चर कंपनी आहे. ती एक एनजीओ देखील चालवते. त्याचबरोबर तिचा एक होम डिकोर स्टोर देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by POP Diaries (@ipopdiaries)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts