बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने सोमवारी आपली मुलगी अथिया शेट्टीचे लग्न क्रिकेटर केएल राहुलसोबत लावून दिले. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मिडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूपच व्हायरल झाले आहेत.
अथिया आणि राहुलच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सुनील शेट्टीचे कधीही न पाहिलेले फोटो समोर आले आहेत. सध्या हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत. ३१ वर्षापूर्वी सुनील शेट्टीने गुजराती मुलगी माना कादरीसोबत लग्न केले होते. चला तर जाणून घेऊया त्यांची लव्ह स्टोरी.
सुनील शेट्टीची लव्ह स्टोरी एका पेस्ट्री शॉपवर सुरु झाली होती. त्यावेळी फोनचा काळ नव्हता. अशामध्ये सुनीलने मानाच्या बहिणीला आपली दोस्त बनवले. सुनील शेट्टी पहिल्या नजरेमध्येच मानाच्या प्रेमात पडले होते. यानंतर मानाच्या बहिणीने दोघांची भेट घालून दिली.
९ वर्षे सुनील शेट्टी आणि मानाने एकमेकांना डेट केल्यानंतर १९९१ मध्ये लग्न केले. सुनील शेट्टी आणि माना शेट्टीला दोन मुले आहेत. ज्यांची नावे अथिया शेट्टी आणि अहान शेट्टी आहेत. दोघांचे फोटो नेहमी सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीचे नुकतेच लग्न झाले आहे. अथिया शेट्टी लहानपणी खूपच क्युट दिसत होती. ती तिच्या वडिलांच्या खूप जवळ आहे.
View this post on Instagram