HomeEntertainmentसुमोना चक्रवर्तीने कपिल शर्मावर लावले गंभीर आरोप, म्हणाली; कपिल माझ्यासोबत...

सुमोना चक्रवर्तीने कपिल शर्मावर लावले गंभीर आरोप, म्हणाली; कपिल माझ्यासोबत…

विनोदी कलाकार कपिल शर्मा चा शो ‘द कपिल शर्मा शो’ प्रसिद्धी बरोबरच काही वादात देखील आलेला आहे. या शो मध्ये काही वेळा पूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ने कपिल शर्मा वर आरोप केला होता की तो त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करत नाही.

या विधानानंतर सोशल मिडिया वर कपिल शर्मा चा शो बंद करण्यासाठी मोहीम चालू केली गेली होती. परंतु त्यानंतर सारे काही शांत झाले आणि आता सर्व ठीक सुरु आहे. त्यासोबतच कपिल शर्मा त्याच्या शो चा पुढील भाग लवकरच घेऊन येत आहे.

शो मध्ये कपिल शर्मा च्या पत्नीची भूमिका करणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ने देखील या बाबतीत आपले मत मांडले आहे की आता सर्व काही ठीक झाले आहे. अशातच सुमोना चक्रवर्ती चा एक विडीओ सोशल मिडिया वर चांगलाच वायरल होताना दिसत आहे.

तसे तर सुमोना चक्रवर्ती चा हा विडीओ खूपच जुना झालेला आहे. या भागामध्ये प्रसिद्ध लेखक चेतन भगत, अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर त्यांचा चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’ च्या प्रमोशन साठी आलेले होते. त्यावेळी कपिल शर्मा सुमोना चक्रवर्ती ची चेष्टा करताना दिसत आहे. त्यावर सुमोना चक्रवर्ती म्हणते की कपिल माझ्यावर जळतो. परंतु हे सर्व या कार्यक्रमाचाच एक भाग होता आणि हे सर्व केवळ फक्त चेष्टा मस्करी पुरते बोलले जाते.

आज सुमोना चक्रवर्ती टीवी इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. परंतु हे खूप कमी लोकांना माहिती असेल की तिने आमीर खान आणि मनीषा कोईराला यांच्या १९९९ मध्ये आलेल्या चित्रपट ‘मन’ मधून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर तिने टीवी वर भरपूर शो केले, परंतु तिला सर्वात मोठे यश हे २०११ मध्ये ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेमध्ये नताशा ची भूमिका करून मिळाली. हा टीवी शो बालाजी टेलिफिल्म यांच्याकडून निर्मित केला गेला होता. त्यासोबतच सुमोना चक्रवर्ती ने मन चित्रपटासोबतच बॉलीवूड मधील आखिरी डिसिजन, बर्फी, किक आणि फिर से या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts