कलाविश्वामधून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण ह्या आता हे जग सोडून निघून गेल्या आहेत. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले आहे.
त्यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. लावणीसम्राज्ञी म्हणून अशी ओळख असलेल्या आणि हिंदी, मारही चित्रपटांमधील ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी झाला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये भोजपुरी, हिंदी, गुजराती, तमिळ अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली.
विशेष म्हणजे लावणीमध्ये त्यांनी अमुल्य असे योगदान दिले. लग्ना अगोदर त्यांनी जवळ जवळ ७० चित्रपटांमधील गाण्यांसाठी आपला आवाज दिला. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. तर सोळाव्या वर्षी त्यांनी मन्ना डे यांच्यासोबत भोजपुरी रामायण’ गायिलं.
रंगल्या रात्री अशा चित्रपटामधील सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या खूपच गाजल्या होतंय. मला हो महत्यात लवंगी मिरची हि लावणी खूपच गाजली होती. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, सारख्या त्यांच्या लावण्या खूपच गाजल्या होत्या.