आज च्या घडीला किस करणे हे प्रेम व्यक्त करण्याचा एक प्रकार मानला जातो, परंतु एक काळ असा होता कि किस चा अर्थ वेगळा होता. छोट्या पडद्यावर सामान्य झालेल्या किसिंग सीन ची कथा खूप मोठी आहे. अशा परिस्थितीत जेव्हा काही सेलिब्रिटींनी पडद्यावर खुलेआम रोमान्स केला तेव्हा लोकांचा श्वास रोखला गेला.
१९९६ मध्ये आलेला सर्वात हिट चित्रपट ‘राजा हिंदुस्तानी’ लोकांच्या मनावर चांगलाच भिडला होता. आमीर खान जेव्हा चित्रपटामध्ये करिष्मा कपूर ला किस करतो. त्या काळामध्ये लीप किस करणे खूपच धाडसाचे काम होते आणि पडद्यावर दाखवणे त्यापेक्षाही कठीण होते. असो लोकांनी चर्चा केल्या परंतु चित्रपटाला हिट होण्यापासून कोणी रोखू शकले नाही आणि हे या चित्रपटातील सर्वात रोमेंटिक आयकॉनिक किस बनला.
इमरान हाशमी चा चाहता वर्ग कायमच त्याच्या बोल्ड अंदाजाचा दिवाना राहिला आहे. ‘जहर’, ‘अकसर’, ‘मर्डर’ मध्ये इमरान हाशमी ने ऑनस्क्रीन किसेस करून असा धुमाकूळ घातला कि प्रत्येकजण चकित झाला. इमरान हाशमी चा चाहता वर्ग बाकी चाहत्यांच्या पेक्षा वेगळा आहे. त्याच्या किसिंग सीन ने स्क्रीन वर खूपच प्रशंसा मिळवली.
बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या ने जेव्हा पहिल्यांदा ऑनस्क्रीन किस केले तेव्हा खूप गोंधळ उडाला होता. ‘धूम २’ मध्ये ऋतिक रोशन च्या विरुद्ध भूमिका साकारलेल्या ऐश्वर्या ने पहिल्यांदा ऑनस्क्रीन किस केले होते आणि हा तिचा पहिला इंटीमेट सीन होता. मग काय बच्चन कुटुंबीयांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेची खूपच प्रशंसा केली आणि मोकळ्या मनाचे असल्याचे कर्तव्य पार पाडले.
तर विरुद्ध जेंडर च्या सोबत किस करणे तर थोडे सामान्य आहे परंतु सारख्या जेंडर ने केलेले पाहून लोकांना धक्का बसतो. चित्रपट गर्लफ्रेंड मध्ये ईशा कोपीकर आणि अमृता अरोरा यांनी हे करून दाखवले जे कोणालाही मान्य नव्हते. दोघी चित्रपटामध्ये लेस्बियन लवर्स देखील बनल्या आहेत आणि लिप किस देखील केले आहे. चित्रपटाला घेऊन खूप गोंधळ देखील उडाला होता.
जेव्हा किस ची गोष्ट येते तेव्हा मल्लिका शेरावत चे नाव आले नाही तर असे होऊ शकत नाही. तिला बॉलीवूड मधील किसिंग क्वीन म्हंटले जाते. तिच्या सुरुवातीच्या चित्रपटामध्ये मल्लिका ने सांगितले होते कि ती कोणालाही ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेरा घाबरत नाही. तिच्या सुरुवातीचा चित्रपट ख्वाहिश मध्ये मल्लिका ने १७ ऑन स्क्रीन किसेस चित्रित केले होते.