अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अप्सरा म्हणून तिला ओळखले जाते. अभिनेत्री सोनालीने अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये खूपच मोठे नाव कमवले आहे. सोनालीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
सध्या सोनाली महाराष्ट्र टुरिझम या शोमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करुन देताना पाहायला मिळत आहे. नुकतेच अभिनेत्रीने अमरावतीला भेट दिली. यादरम्यान तिने अमरावतीमधील खाद्य संस्कृती आणि ठिकाणांची माहिती दिली. याचबरोबर तिने अमरावतीमधील प्रसिद्ध अंबाबाई मंदिरामध्ये जाऊन दर्शन देखील घेतले.
विशेष म्हन्ज्ते तिने मंदिरासमोर गोंधळ देखील घातला. अभिनेत्रीने तिचा हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. ज्यामध्ये ती गोंधळ घालताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेयर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि “अंबादेवी मंदिरासमोर गोंधळींसोबत उत्स्फुर्तपणे गोंधळात सामिल होताना…”
अभिनेत्री सोनालीने हा व्हिडीओ शेयर करताच अल्पावधीमध्ये तो प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट आणि लाईक केले आहे. सोनालीने आपल्या अभिनयाने मराठी दर्शकांच्या मनावर राज्य केले आहे. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता, ज्यानंतर ती मितवा, नटरंग, धुरळा, हिरकणी सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. अप्सरा अली हे गाणं तिचे विशेष गाजलं होतं.
View this post on Instagram