२० वर्षाच्या कमी वयामध्ये तुनिषा शर्मा ने तर या जगाचा निरोप घेतला, परंतु तिच्या मागे काही प्रश्न सोडून गेली. नाव आणि प्रसिद्धी असून देखील तुनिषा शर्मा ने आत्महत्या का केली? हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. आता सोफिया हयात ने तुनिषा च्या मृत्यू नंतर आपले मौन सोडले आहे. सोफिया ने तुनिषा शर्मा च्या आत्महत्येला कारणीभूत कास्टिंग दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितले आहे.
सोफिया चे म्हणणे आहे कि कास्टिंग दिग्दर्शक तरुण मुलींना त्यांच्या पेक्षा मोठ्या वयाच्या मुलांसोबत कास्टिंग करत असत. सोफिया ने सांगितले कि तिच्या म्हणण्याप्रमाणे, अशा प्रकरणामध्ये सर्वात मोठे आरोपी हे निर्माते असतात, जे टीवी मालिकांमध्ये तरुण मुलींना त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांसोबत रोमान्स करण्यास भाग पाडतात.
सोफिया हयात म्हणाली, हे ऐकून खूप दुखः होते कि तरुण स्टार्स नातेसंबंध तुटल्यामुळे आत्महत्या करतात. मला खरोखर वाटते कि या प्रकरणामध्ये निर्माते सर्वात जास्त दोषी आहेत. त्या एवढ्या लहान मुलीला तिच्या पेक्षा जास्त मोठ्या मुलासोबत रोमान्स करायला लावतात. तिच्या विरुद्ध कास्टिंग करतात. अशा मुली ज्यांनी अभिनयाची सुरुवातच केलेली असते, ज्या अनुभवी नसतात, त्या सहजपणे लोकांच्या बोलण्यात येतात.
सोफिया ने पुढे सांगितले कि, त्यामुळेच तरुण अभिनेत्री त्यांच्या पेक्षा मोठ्या वयाच्या मुलांच्या सोबत से क्शु अली इन्वोल्व होतात, कारण ते लोक त्यांना आपल्या बोलण्यात फसवतात आणि इंडस्ट्री मध्ये से क्शुअ ल इंटीमेसी खूपच साधारण गोष्ट आहे. मला माहिती आहे, कारण कि माझ्या सोबत देखील निर्मात्यांनी असे केले आहे. परंतु मी त्यांना दुसऱ्या गोष्टींमध्ये फिरवत असे. सोफिया हयात ने यावर प्रश्न उठवत म्हणाली कि – अजूनहि मालिकेचे निर्माते या प्रकरणावर शांत का बसले आहेत? त्यांनी अजून यावर अजून आपले मत का मांडलेले नाही?
सोफिया पुढे म्हणाली – आजकाल पैसा बोलतो, त्यामुळे विवादातील आत्महत्येची प्रकरणे बिन कोणतीही चौकशी होता बंद करतात. मोठ्या पदावरील लोक पोलिसांना पैसे देऊन प्रकरण बंद करतात. पुढे भविष्यात असे होण्यापासून थांबवण्यासाठी स्टार्स पुढे येऊ शकतात काय? सोफिया ने सांगितले कि, ती हे पाहून चकित झाली आहे कि भारतात कसे मनोरंजनाच्या जगाला पवित्र मानले जाते आणि निर्मात्यांना ‘देवाचा’ दर्जा दिला जातो. सोफिया हयात च्या या सांगण्यावर तुमचे काय मत आहे?