प्रसिद्ध इंडो कनाडाइ टिक-टॉक स्टार आणि सोशल मिडिया वरील प्रभावशाली मेघा ठाकूर चे निधन झाले आहे. ती २१ वर्षांची होती. मेघा ठाकूर च्या निधनाने तिच्या कुटुंबा सहित तिचे चाहते देखील खूप दुःखी आहेत. मेघा ठाकूर च्या निधनाच्या बातमीला तिच्या आई वडिलांनी याची पुष्टी केली. त्यांनी त्यांच्या मुलीच्या निधनाच्या बातमीची पुष्टी करताना एक पोस्ट शेअर करत ही दुखद बातमी जगाला दिली.
टिक-टॉक स्टार च्या आई वडिलांनी इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहिले, “खूपच दुखात आम्हाला सांगावे लागत आहे की आमची सुंदर मुलगी २४ नोव्हेंबर ला तिचे अचानक निधन झाले आहे”. पुढे त्यांनी या पोस्ट मध्ये त्यांच्या दिवंगत मुलीला उर्जावान संबोधले आहे. पोस्ट मध्ये पुढे लिहिले आहे, “मेघा आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि स्वावलंबी तरुण मुलगी होती.
ती तिच्या चाहत्यांवर खूप प्रेम करत होती. त्यामुळे तिला वाटत होते की तिच्या निधनाची बातमी सर्वांना समजली पाहिजे. यावेळी, आम्ही मेघा साठी तुमच्या प्रार्थना आणि संवेदना मागत आहोत. तुमचे विचार आणि प्रार्थना तिच्या पुढील यात्रे साठी तिच्या सोबत राहतील. तुझी कायम आठवण येत राहील”.
मेघा ठाकूर च्या पालकांच्या पोस्ट नुसार, तिचे निधन २४ नोव्हेंबर ला झाले आहे. सोशल मिडीयावर ही भावनिक पोस्ट वायरल झाली आहे. मेघा चे चाहते तिला श्रद्धांजली देण्यासाठी इंस्टाग्राम आणि ट्विटर वर पोस्ट शेअर करत आहेत. त्त्यांच्या सोबत अनेक चाहत्यांनी मेघा च्या पालकांच्या पोस्ट वर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोशल मिडीयावर मेघा ठाकूर तिच्या लुक आणि कर्वी फीगर साठी प्रसिद्ध होती ती कायम शरीराच्या सकारात्मक ते बद्दल बोलायची आणि चाहत्यांचे मनोबल वाढवत असे. मिडिया रिपोर्ट नुसार ती सामान्यतः मध्यप्रदेश च्या इंदोर शी संबंधित आहे. परंतु ती तिच्या कुटुंबीयांसोबत कनाडा मधील ओंटारीयो च्या ब्रेम्पटन मध्ये रहात होती. ट्विटर वर तिचे ९३००० आणि इंस्टाग्राम वर १०२००० फॉलोअर्स होते.
View this post on Instagram