लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत तुम्ही अनेक जादूचे शो पाहिले असतील. कधी टीव्हीवर, कधी समोर तर कधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही अनेक मॅजिकल ट्रिक पाहिल्या असतील. जादू करणारा जादूगार अशी जादू करतो कि ज्यामुळे आपण चकित होतो. एकामागून एक ट्रिक करून डोळ्यांना धोका देण्याचे काम करतो. अशामध्ये सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका मुलीने देखील अशी ट्रिक दाखवली आहे जी तुमचे मन जिंकेल.
@TheFigen_ या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे ज्यामध्ये एक लहान मुलगी मॅजिकल ट्रिक करताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान तिने पडद्याच्या मागून गायब करण्यासाठी तिने आपल्या लहान भावाची निवड केली आणि त्याला एका फटक्यात गायब केले. पण पुढच्याच क्षणी भावाच्या एका छोट्या चुकीमुळे तिची ट्रिक बिघडली. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील हसू लागला. या व्हिडीओला आतापर्यंत ६ लाखापेक्षा जास्त व्हिव मिळाले आहेत.
मॅजिकल ट्रिकचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोणताही फेमस किंवा एक्स्पर्ट जादुगार नाही तर एका लहान मुलीच्या जादूने सर्वांना हैराण केले आहे. तुम्ही नेहमी जादूच्या शोमध्ये पाहिले असे कि लोक कपड्याच्या मागून माणसाला गायब करतात. मुलीने देखील टॉवेलच्या मदतीने तीच जादू दाखवली आणि ती आपल्या लहान भावाला गायब करू लागली. ती जादू करण्यात सफल देखील झाली पण तिच्या भावाने एक चूक केली आणि ती मुलगी चांगलीच भडकली आणि तिने भावाला जोरदार लाथ मारली.
व्हिडीओ मधील मुलगी जादुगार नाही, तथापि ती हुशारीने जादुगार बनण्याचा प्रयत्न करत आहे. दरवाजाच्या चौकटीवर टॉवेल लागून ती भावाला पळवण्याचा जुगाड करू लागते, जेणेकरून टॉवेल काढताच भाऊ गायब दिसावा आणि लोकांनी तिचे कौतुक करावे. पण भावाने लपताना थोडी चूक केली आणि त्याचे पाय दरवाजामध्ये दिसू लागले. ज्यामुळे त्याच्या बहिणीची जादूची ट्रिक फेल गेली आणि जसे तिची नजर तिच्या भावाच्या पायावर पडली तसे तिला रागाने त्याला लाथ मारली. लहानग्या क्युट जादुगरचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूप पसंद केला जात आहे.
When the trick doesn’t turn out as you expected. ❤️🤣 pic.twitter.com/tU95x4WlTQ
— The Figen (@TheFigen_) February 27, 2023