HomeBollywoodपुष्पा चित्रपटामधील ‘सामी सामी’ गाण्यावर चीमुकलीचा भन्नाट डांस व्हायरल, पाहून रश्मिका मंदाना...

पुष्पा चित्रपटामधील ‘सामी सामी’ गाण्यावर चीमुकलीचा भन्नाट डांस व्हायरल, पाहून रश्मिका मंदाना देखील झाली तिची फॅन…

अल्लू अर्जुन चा चित्रपट ‘पुष्पा’ मधील ‘सामी सामी’ गाणे सुपरहिट झाले आणि या गाण्यावर लोकांनी जोरदार रील्स बनवल्या. तसेच या गाण्यावर बॉलीवूड पासून ते टीवी स्टार्स पर्यंत सर्वांचे रील्स खूपच चर्चेत राहिलेत आतातर एक लहान गोंडस मुलीचा विडीओ इंटरनेट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या मुलीचा डान्स आणि हावभाव इतके अप्रतिम आहेत की तुम्ही ते शेवट पर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही. असेच काही हाल चित्रपट ‘पुष्पा’ च्या ‘सामे सामे’ गाण्यात दिसणारी रश्मिका मंदाना चे झाले आहेत, जी या मुलीचा विडीओ पाहून थक्क झाली आहे आणि आता ती या लहान मुलीला भेटण्यास आतुर झाली आहे.

इंटरनेट वर वायरल या विडीओ वर रश्मिका मंदानाची नजर पडली आणि त्याला शेअर करण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही. रश्मिका मंदाना ने ट्विटरवर मुलीचा तो विडीओ शेअर केला आहे आणि सांगितले आहे की तिने हे पाहून वेडी झाली आहे.

रश्मिकाने विडीओ शेअर करत कैप्शन मध्ये लिहिले आहे, “वेडी झाले मी, तिने माझा दिवस चांगला घालवला, मी या गोंडस मुलीला भेटू इच्छिते, कसे भेटू शकेन मी?”त्यासोबतच तिने घायाळ हृदयाची इमोजी शेअर केली आहे.

३१ सेकंदांच्या या विडीओ मध्ये एक छोटीसी गुबगुबीत बाळ शाळेच्या ड्रेस मध्ये डान्स करताना दिसत आहे. मुलीसोबत मागे आणखी काही शाळेतील मुले डान्स करताना दिसत आहेत.तुमची नजर देखील मुलांच्या गर्दीमध्ये तिच्यावरच जाणार जिथे ती छोटी मुलगी आहे. ती मुलगी रश्मिकाचा डान्स सोडून त्याव्यतिरिक्त जे हावभाव दाखवत आहे त्यावर सोशल मिडिया युजर्स वेडे होत आहेत.

तथापि हा विडीओ तेजा नावाच्या अकाऊंट वरून ट्विटर वर अलीकडेच शेअर केला गेला आहे. विडीओ ला शेअर करताना कैप्शन मध्ये लिहिले आहे, गोंडस आणि विडीओ रश्मिका मंदाना ला टेग पण केला गेला आहे. विडीओ ला वेगवेगळ्या कमेंट देखील आलेल्या आहेत. ज्यामध्ये लिहिले आहे की हा विडीओ नेपाळ च्या एका शाळेच्या कार्यक्रमातील आहे ज्यामध्ये या मुलीने आपल्या डान्स हालचाली आणि हावभाव करून सर्वांचे लक्ष खेचले आहे. काही लोक तिला छोटी रश्मिका म्हणून बोलावत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts