तुम्ही पंजाबी गाण्यावर डांस करणाऱ्या छोट्या मुलीचा व्हायरल व्हिडीओ पाहिला आहे का. वैराया नावाची लहान मुलगी इतर विद्यार्थ्यांसोबत वेढलेली दिसत आहे. ती आपल्या स्कूल यूनिफॉर्ममध्ये भाभो मेहंदी ई सिंघा वेलना लिया या पॉपुलर पंजाबी गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ आतापर्यंत ६ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओमध्ये वैराया आपल्या शाळेमध्ये एका सराव सत्रादरम्यान अविश्वसनीय पंजाबी लोक डांसची झलक दाखवते. इतर मुलांसोबत डांस करताना तुम्ही तिला पाहू शकता. मुलीच्या क्युट एक्सप्रेशन आणि मूव्हने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यावर विश्वास ठेवणे कठीण आहे कि ती फक्त यूकेजी मध्ये आहे. इंटरनेटवर सध्या या क्युट मुलीचा क्युट डांस व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका युजरने कमेंट केली आहे कि, हा कल्चर आणि डांस आहे आणि क्यूटनेस ओवरलोडेड आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हंटले आहे कि या गाण्यावर आतापर्यंतचा सर्वात क्युट आणि उत्कृष्ट डांस आहे. सर्व मुले खूपच गोड दिसत आहेत. देव तुमचे भले करो.
लहान मुलीचा हा व्हिडीओ खूपच पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये इतर छोट्या मुली देखील डांस करताना दिसत आहेत. लोकांनी जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा ते सुपर क्युट बोलताना दिसले. सोशल मिडियावर या क्युट डांसला पाहून एका युजरने तर हे देखील म्हंटले कि हिने क्युटनेसच्या सर्व हद पार केल्या.
View this post on Instagram