युपी च्या संभल मध्ये भावाने आपल्या बहिणीची गळा दाबून ह त्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी मृ तदे ह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्ट्मसाठी पाठवण्यात आला आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गु न्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
हि घटना राजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे एका मुलीचे बुलंदशहरच्या राजकुमार नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. माहितीनुसार, गुरुवारी रात्री मृत तरुणीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. शुक्रवारच्या सकाळी मुलीचा भाऊ नितीन काही आवाजाने जागा झाला, तो तिच्या बहिणीच्या खोलीमध्ये गेला.
तिथे भावाने त्याच्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत वाईट अवस्थेत दिसली. हे पाहून भावाला खूप राग आला. अशातच प्रियकर तिथून पळून गेला, त्यामुळे संतापलेल्या भावाने बहिणीचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले कि, एका स्थानिक व्यक्तीने पोलीस ठाण्यात येऊन आपल्या मुलाने त्याच्या बहिणीची हत्या केली आहे सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी मृ तदे ह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच या तरुणाने आपल्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृ त मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे