ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या फसवणुकीचा आणि नणंदने ब्लॅकमेल करत असल्याचा एक किस्सा रेडीट वर शेअर केला आहे. ज्याला वाचून युजर्स चकित झाले आहेत. त्या महिलेने रेडीट वर लिहिले कि, दोन वर्षांपूर्वी तिची नणंद ने तिला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडले होते. नणंद ने त्यानंतर तिला तिच्या जवळ बोलावले आणि म्हणाली कि एकतर तिने तिच्या पती ला तिच्या फसवणुकीची संपूर्ण कहाणी पतीला सांगावी किंवा गप्प राहण्यासाठी तिची एक अट मान्य करावी.
महिलेने रेडीट वर अज्ञातपणे हि कथा शेअर केली आहे. तिने सांगितले कि लग्नानंतर तिचे तिच्या ऑफिस मधील एका व्यक्तीसोबत संबंध सुरु होते पण ती लवकरच पकडली गेली. परंतु तिला रंगेहात पकडणारी तिच्या पतीची बहिण होती आणि तिने तिचे जगणे कठीण केले होते.
गप्प बसण्यासाठी तिच्या नणंद ने तिच्या कडे मोठ्या रकमेची मागणी केली. महिलेने सांगितले कि तिच्या जवळ त्याव्यतिरिक्त कोणता पर्याय हि नव्हता, जर ती तिच्या पतीला सगळे खरे सांगितले असते तर तिचा घटस्फोट झाला असता. अशातच तिने तिच्या नणंद चे तोंड बंद करण्यासाठी तिची हि मागणी पूर्ण केली. परंतु त्यानंतर देखील ती सारखे सारखे तिला ब्लॅकमेल करत राहिली.
महिलेने सांगितले कि तिची नणंद एमा तिच्या कडून बदला घेण्यासाठी उत्सुक होती. कदाचित लग्नानंतर वहिनीचे अनैतिक संबंध असल्याने तिला जास्त त्रास होत असावा कारण तो व्यक्ती तिच्या वाहिनीचा फिटनेस ट्रेनर होता. महिलेने पुढे सांगितले कि एमा चा व्यवसाय बुडाला होता, आणि तो तिला परत सुरु करायचा होता.
त्यादरम्यान हे घडले आणि तिला तिच्या वहिनीला ब्लॅकमेल करून पैसे कमावण्याची संधी मिळाली. महिलेने सांगितले कि, या सगळ्यात फक्त माझ्या वाहिनीचा दोष नाही, कारण हे सर्व सुरु झाले माझ्या अनैतिक संबंधामुळे’. तथापि, महिलेने रेडीट वर हे देखील लिहिले होते कि नणंद एमा द्वारे पकडल्यामुळे तिने तिच्या संबंधांना कायमचे संपुष्टात टाकण्यात आले, तसे असूनदेखील ती तिला ब्लॅकमेल करत राहिली.