सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारी रोजी सूर्यगड पॅलेसमध्येमध्ये लग्न केले. सिद्धार्थ-कियाराने आपल्या लग्नानंतर सोशल मिडियावर काही खास फोत शेयर केले होते. या फोटोंमधील एका फोटोमध्ये दोघे एकमेकांसमोर हात जोडलेले पाहायला मिळत आहेत.
सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग फोटोंवर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. पण तुम्हाला हे माहिती आहे का कि सिद्धार्थ-कियाराने लग्नामध्ये एकमेकांसमोर हात का जोडले. यामध्ये खूपच सुंदर कथा जोडलेली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाचे मुमेंट कॅमेऱ्यामध्ये कैद करणाऱ्या विशाल पंजाबीने सिद्धार्थ-कियाराच्या एकमेकांसमोर हात जोडणाऱ्या फोटोमागील सत्य सांगितले आहे.
माहितीनुसार विशालचे म्हणणे आहे कि सिद्धार्थ आणि कियारा दोघेही ग्रेटफुल आहेत. अशामध्ये त्यांचं लग्नाच्या व्हिडीओमध्ये हे प्रतिबिंबित व्हायला हवे होते. हात जोडलेले, एकमेकांकडे चेहरा करून दोघांचा हा फोटो त्यांच्या कमिटमेंट आणि एकमेकांसाठी नेहमी विनम्र आणि प्रेमाने राहण्याचे वाचन दर्शवितो.
सिद्धार्थ आणि किय्राचे लग्न ७ फेब्रुवारी रोजी झाले होते. लग्नानंतर दोघांनी १२ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी ठेवली होती. जिथे फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक सेलेब्सनी हजेरी लावली होती. सिद्धार्थ-कियाराच्या फोटोजनी कॅटरीना कैफ-विक्की कौशल आणि आलिया भट्ट-रणबीर कपूरचा देखील रेकॉर्ड मोडला आहे. सिद्धार्थ-कियाराचा वेडिंग फोटोज बोलीव्द सेलेब्समधील नुकत्याच झालेली लग्नांमध्ये सोशल मिडियावर सर्वात जास्त पसंद केलेले फोटो बनले आहेत.
View this post on Instagram