कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये ७ फेब्रुवारी रोजी लग्न केले. ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांच्या लग्नानंतर चाहते खूपच खुश आहेत. कपल च्या लाग्नाच्ये फोटो अजून देखील सोशल मिडियावर पसंद केले जात आहेत.
नुकतेच दोघांचे रिसेप्शनदेखील खूप चर्चेमध्ये राहिले होते. रिसेप्शन फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यादरम्यान कियारा अडवाणीने आपल्या हळदी सेरेमनीचे फोटो सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत.
कियाराने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून व्हॅलेंटाईन डे निमित्त हळदी सेरेमनीचे काही फोटो शेयर केले आहेत. हे फोटो शेयर करत तिने सिद्धार्थ बद्दलचे आपले प्रेम देखील व्यक्त केले आहे. फोटोमध्ये सिद्धार्थ पिवळा कुर्ता आणि मल्टीकलर्ड शॉलमध्ये हँडसम दिसत आहे. तर कियारा आइवरी कलरच्या हेवी एंब्रॉयडरीवाल्या लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेयर करत कियाराने कॅप्शनमध्ये ‘प्यार का रंग चढा’ असे लिहिले आहे.
नुकतेच मुंबईच्या सेंट रेजिसमध्ये कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राचे भव्य रिसेप्शन पार पडले. यादरम्यान दोघे मनीष मल्होत्राच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होते. सिद्धार्थ मल्होत्राने चमकदार काळ्या रंगाचा टक्सिडो घातला होते तर कियारा एका अनोख्या फिशटेल गाउनमध्ये पाहायला मिळाली होती. दोघेही आपल्या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होते आणि एकमेकांना कॉम्प्लीमेंट करत होते.
View this post on Instagram