यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा खूपच अनोखा ठरणार आहे कारण अनेक दिग्गज कलाकार आपल्याला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळणार आहेत. पुष्पा फेम अभिनेत्री देखील या सोहळ्यामध्ये आपली विशेष उपस्थिती दाखवत लावणीवर थिरकताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सचिन आणि सुप्रियाची जोडी देखील धमाकेदार परफॉर्मन्स करताना दिसणार आहे.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील लाडके मामा यांना जीवनगौरव पुरुस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पन्नास पेक्षा जास्त हिंदी चित्रपट, दोनशेपेक्षा जास्त मराठी चित्रपट, पंधरा टीव्ही सिरियल्स, पंचवीस नाटके इतका प्रचंड मोठा अशोक मामांचा प्रवास आहे आणि हा प्रवास आज देखील सुरूच आहे.
सोह्ल्यादार्म्यान अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या नृत्यामधून अशोक मामाचा प्रवास दाखवताना खूपच भावूक झाला. नुकतेच याचा एक प्रमो व्हिडीओ झी मराठीच्या अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे. नृत्य सादर झाल्यानंतर सिद्धार्थ जाधवने जे काही केले त्यामुळे सर्वांच्याच डोळ्यामध्ये आनंदाश्रू वाहू लागले.
अभिनेता सिद्धार्थ जाधव खूपच भावूक झाला आणि त्याने मंचावरून खाली येऊन आपल्या हातातील फुलांचा हार अशोक सराफ यांना घातला आणि त्याने सरळ त्यांना साष्टांग दंडवत घातला. हे पाहताच अशोक सराफ देखील खूप भावूक झाले. त्यांनी हात जोडत मानवंदना स्वीकारली. यादरम्यान तिचे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यातून पाणी आले. यानंतर अशोक सराफ यांचा हात धरून सचिन पिळगावकर हे त्यांना मंचावर घेऊन गेले आणि यानंतर अशोक सराफ यांनी सर्वांचे हात जोडून आभार मानले. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram