चित्रपट इंडस्ट्री मधील अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटांना घेऊन अनेकदा चर्चेत येत असतात. परंतु त्याव्यतिरिक्त ते त्यांच्या ग्लेमरस आणि डेशींग लुक मधील फोटोंमुळे प्रसिद्ध होतात. कायमच स्टार्स सोशल मिडीयावर त्यांचे फोटो शेअर करत असतात जे सर्व बाजूने एकदम परफेक्ट असतात. तथापि अशातच साउथ चित्रपट प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन ने तिचे खूपच वेगळे फोटो शेअर केले आहेत.
श्रुती ने तिच्या इंस्टाग्राम वर काही असे फोटो शेअर केले आहेत की, जसे साधारणतः स्टार शेअर करत नाहीत. पहिल्या फोटो मध्ये श्रुती मोकळ्या केसांमध्ये दिसत आहे. तसेच आणि दुसऱ्या फोटो मध्ये एकदम आजारी आणि थकलेली दिसत आहे.
या फोटो ना शेअर करताना श्रुती ने कैप्शन मध्ये लिहिले हे की, “परफेक्ट सेल्फी आणि पोस्ट च्या जगामध्ये, काही असे जे शेवट पर्यंत पोहोचले नाही, खराब केसांचा दिवस,ताप आणि साइनस मध्ये सुजलेला दिवस, पिरियड क्रेम्प चा दिवस आणि अशी आशा आहे की तुम्ही याला देखील पसंत कराल.
तसे तर स्टार्स च्या ग्लेमरस फोटो मध्ये चाहते खूप प्रेम करताना दिसतात. परंतु श्रुती चा हा एकदम साधा अंदाज देखील लोकांच्या मनात घर करताना दिसत आहे. लोक तिच्या या फोटो ला खूप लाईक करताना दिसत आहेत आणि शेअर केल्याची प्रशंसा करत आहेत. एका युजर ने या पोस्ट वर कमेंट करताना लिहिले की, “खरे खरे असते, त्याची तुलना नाही करू शकत”. दुसऱ्या एका युजर ने लिहिले, “खूपच गोंडस चेहरा”. तसेच आणखी एका चाहत्याने लिहिले की, “तरी देखील सुंदर”.
श्रुती हसनच्या या फोटो वर युजर नि अशा प्रकारे कमेंट पाहायला मिळत आहेत. लोक तिच्या या लुक ला खूपच अप्रतिम म्हणत आहेत, सोबतच बदामाच्या आकाराचे इमोजी च्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. प्रत्यक्षात, जर श्रुती हसन च्या कामाबद्दल बोलाल तर अभिनेत्री प्रभास च्या ‘सालार’ सोबतच बाळकृष्ण चा ‘वीर सिन्हा रेड्डी’ आणि चिरंजीवी चा ‘वाल्तेयर विराय्या’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram