साउथ आणि टीव्ही वरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्या मागील काही दिवसांपासून तिचे लग्न आणि तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मागील वर्षी अभिनेत्रीने नौदल ऑफिसर राहुल नागल सोबत लग्न केले होते. अशातच आता बातमी येत आहे कि ती आई बनली आहे आणि बाळाचा पहिला फोटो सोशल मिडीयावर दाखवण्यात आला आहे.
टीव्ही मालिका ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री श्रद्धा आर्या ने मागील काही दिवसांपूर्वी तिच्या गरोदर पणाची बातमी शेअर केली होती. तिने बेबी बंप दाखवतानाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते, ज्याबद्दल लोकांनी खूप प्रश्न देखील केले होते तसेच तिला शुभेच्छा देखील दिल्या होत्या. तो तिच्या खऱ्या नाही तर रील बद्दल होते. अशातच आता तिने लहान बाळाचे स्वागत केले आहे.
हा होय, श्रद्धा ने एका मुलीला जन्म दिला पण हे प्रकरण खरे नसून रील आहे. तिने टीव्ही मालिका ‘कुंडली भाग्य’ मध्ये मुलीला जन्म दिला आहे. त्यामध्ये अभिनेत्रीची प्रीती ची भूमिका घराघरात प्रसिद्ध आहे. श्रद्धा आणि बाळाच्या सोबत चे फोटो तिच्या सहकलाकार असलेल्या साहिल गंभीर ने शेअर केले आहेत. त्याच्या पोस्ट वर लोक अभिनेत्रीला खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लोकांच्या खूप साऱ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एकाने लिहिले, ‘शक्ती खऱ्या जीवनात कधी गोड बातमी देणार आहेस?’.
दुसऱ्या एकाने लिहिले, ‘मी ऐकले आहे कि तू मुलीला जन्म दिला आहेस, काय हे खरे आहे?’. काही म्हणत आहेत कि तू खुलासा करणार नाहीस काय’. आणखी एकाने लिहिले कि, ‘एवढे मोठे बाळ’. अशाच प्रकारे लोक फोटोंना पाहून चकित करणाऱ्या प्रतिक्रिया देत आहेत.
तुम्ही पाहिले असेल कि टीव्ही मालिका ‘कुंडली भाग्य’ मध्ये श्रद्धा आर्या १० वेळा नवरी बनली आहे. आता यावेळी नवरी बनल्यानंतर ती आई देखील बनली आहे. परंतु हे फक्त टीव्ही मालिकेसाठी आहे. खऱ्या जीवनाबद्दल अभिनेत्रीने असे कोणत्याप्रकारचे नियोजन केले असल्याचे सांगितलेले नाही. अभिनेत्रीने मागील काही दिवसांपूर्वी टीव्ही मालिका ‘कुंडली भाग्य’ बद्दल शेअर केले होते कि यामध्ये लवकरच लीप येणार आहे, त्यामुळे मालिकेमध्ये श्रद्धा चे गरोदर असल्याचे दाखवण्यात आले आहे. २० वर्षाच्या लीप नंतर श्रद्धा आणि शक्ती यांची भूमिका समाप्त होणार आहे.