भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरामध्ये पुन्हा एकदा लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानीची सून श्लोका मेहता प्रेग्नंट आहे आणि ती लवकरच पुन्हा एकदा आई होणार आहे. श्लोका मेहताचे फोटो सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये ती आपले बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हे फोटो मेकअप आर्टिस्ट पुनीत बी सैनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. श्लोका ने NMAAC इवेंट दरम्यान आपल्या प्रेग्नंसीचा खुलासा केला आहे. तसे तर श्लोकच्या चेहऱ्यावर आई बनण्याचा ग्लो स्पष्ट दिसत आहे.
पण या इवेंटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. श्लोकने NMAAC इवेंट साठी क्रीम कलरच्या स्कर्टसोबत ग्रीन कलरचा क्रॉप टॉप घातला होता. तर केसांना मिडिल पार्टिशन करून त्यामध्ये अनेक प्रकारचे हेयर एक्ससरीज घातले होते. अंबानी कुटुंबाची सून खूपच सुंदर दिसत होती.
श्लोका मेहता आणि आकाश अंबानीचे लग्न २०१९ मध्ये मोठ्या धूमधडाक्यात झाले होते. त्यानंतर ते २०२० मध्ये पहिल्यांदा आईवडील झाले. श्लोकाच्या मुलाचे नाव पृथ्वी आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आजी-आजोबा बनून खूपच खुश होते. काही दिवसांपूर्वी ईशा अंबानीने देखील जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यामध्ये आता काही शंका नाही कि अंबानी कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
View this post on Instagram