९० च्या दशकामध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोण ओळखत नाही. शिल्पा शिरोडकरने तिच्या करिअर मध्ये गोविंदा पासून सुनील शेट्टी पर्यंत प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले आहे. चित्रपट ‘आंखे’ असो किंवा ‘गोपी किशन’ प्रत्येक चित्रपटात तिने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. तथापि मागील काही दिवसांपासून ती अभिनयाच्या जगापासून दूर आहे. आता अलीकडेच पहिल्यांदा शिल्पा शिरोडकर ने बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये तिच्याबद्दलचा दृष्टीकोन सांगितला.
वास्तविक, शाहरुख खान चा चित्रपट ‘दिल से’ मधील गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. या गाण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा दिसली होती ज्यामध्ये तिने आपल्या उत्कृष्ट डान्स मूव्हज ने सर्वांची मने जिंकली होती. सांगितले जाते कि हे गाणे आधी शिल्पा शिरोडकर ला देण्याचे ठरवले होते परंतु लठ्ठपणामुळे तिला वगळण्यात आले.
आता अलीकडेच शिल्पा शिरोडकर ने यावर आपले मौन सोडताना सांगितले कि, “छैया छैया सारखे गाणे कोणाला करायचे नसेल? फराह खान गाण्याला घेवून माझ्याकडे आली होती. तिने सांगितले होते कि यासाठी ती माझा विचार करत आहे. परंतु नंतर तिला वाटले कि मी जाड आहे, त्यामुळे त्यांनी मलायका ला या गाण्यामध्ये घेतले”.
जेव्हा शिल्पा ला हे विचारले गेले कि, शिल्पा शिरोडकर ला तिच्या दिसण्यामुळे आणि वजनामुळे तिच्या कारकिर्दीत प्रगती करणे कठीण होते काय? त्यावर उत्तर देताना तिने सांगितले कि, “मला हे आठवत नाही की माझे वजन अथवा मी कशी दिसते यामुळे माझ्या यशावर काही परिणाम झाला असेल.
९० च्या दशकामध्ये या गोष्टीना महत्व नव्हते. आम्ही एका वेळी अनेक प्रोजेक्ट्स मध्ये काम केले होते. अनेक वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम केले”. पुढे अभिनेत्रीने सांगितले कि, ‘जरा कल्पना करा ९० च्या दशकामध्ये त्यांनी मला जाड म्हंटले, तर देवालाच माहित, आता हे लोक मला काय म्हणतील?.
मिथुन दा च्या बद्दल बोलताना शिल्पा सांगते कि, “माझे इंडस्ट्री मध्ये काम करण्याचे कारण मिथुन चक्रवर्ती होते. जेव्हा माझ्या कडून ‘सौतन कि बेटी’ आणि बोनी कपूर चा चित्रपट ‘जंगल’ निघून गेले तेव्हा इंडस्ट्री ने मला ‘खराब’ म्हणून हाकलून दिले होते. परंतु दादा ने मला ‘भ्रष्टाचार’ मध्ये भूमिका दिली आणि अशाप्रकारे इंडस्ट्री मध्ये माझ्या कामाची सुरुवात झाली. शिल्पा ने सागितले कि, अनिल कपूर ने देखील तिची अनेकवेळा मदत केली.
जेव्हा शिल्पाला पुनरागमनाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने असे सांगितले, “हो, नक्कीच, मला पुन्हा चित्रपट करायला आवडेल. मला डीजीटल प्लेट्फोर्म देखील काही चांगले काम करायचे आहे. परंतु जेव्हा मी लोकांच्या सोबत बोलते, तर ते सांगतात कि तू खूप दूर राहता, ते शक्य होणार नाही”.