HomeBollywoodफोटोग्राफर्सवर भडकली शिल्पा शेट्टी, म्हणाली; ‘आता काय तोंडामध्ये...’, व्हिडीओ व्हायरल...

फोटोग्राफर्सवर भडकली शिल्पा शेट्टी, म्हणाली; ‘आता काय तोंडामध्ये…’, व्हिडीओ व्हायरल…

शिल्पा शेट्टी तसे तर फोटोग्राफर्सच्या फेवरेट सेलेब्रिटीपैकी एक आहे. अभिनेत्री कधीच पोज देण्यास मागेपुढे बघत नाही आणि चाहत्यांना फोटोसाठी कधीच निराश करत नाही. नेहमी येता-जाता ती फोटोग्राफर्ससोबत बातचीत करताना पाहायला मिळते. प्रत्येकासोबत ती नम्रपणे वागते. पण आज काही वेगळेच झाले. शिल्पा चक्क फोटोग्राफर्सवर चांगलीच भडकली.

शिल्पा शेट्टी इंडस्ट्रीमधील सर्वात फॅशनेबल सेलिब्रिटींपैकी एक आहे. शिल्पाची स्टाईल अनेकदा लोकांना खूप आकर्षित करते. चाहते तिची एक झलक मिळवण्यासाठी नेहमीक आतुर असतात. यामुळे फोटोग्राफर्स तिला पाहताच तिच्या पाठीमागे लागतात. पण यावेळी फोटो घेण्याच्या चक्करमध्ये पॅप्सनेने चूक केली. मग काय, शिल्पाने त्याला चांगलेच सुनावले.

वास्तविक झाले असे कि शिल्पा एका बिल्डींगमधून बाहेर येत होती. तेव्हा पॅप्सने तिला स्पॉट केले. नंतर सर्वजण तिच्या मागेच लागले. शिल्पादेखील कँडिड अंदाजामधून त्यांच्या समोरून निघून गेली. शिल्पाने थांबून, आणि धावत वेगवेगळ्या पोज दिलाय. नंतर ती आपल्या कारमध्ये जाऊ लागली. पण फोटोग्राफर्सचे मन इतक्यात भरले नाही. त्यांनी शिल्पाला थांबवण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान ते तिच्या खूपच जवळ गेले.

पॅप्सच्या या हरकतीमुले नाराज होत शिल्पा म्हणाली कि, आता काय माझ्या तोंडामध्ये घुसून फोटो घेणार का. इतके बोलल्यानंतर शिल्पा कारमध्ये परत जाऊ लागली. पण यादरम्यान तिला कारमध्ये बसताना डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली. पण शिल्पा खेळकर अभिनेत्री आहे, ती कोणावर देखील रागावली नाही, तर ती हसून बाय करून निघून गेली.

हा पूर्ण व्हिडीओ व्हायरल भैयाणीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. शिल्पाच्या भडकण्यावर आणि तिच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर युजर्स देखील तिची चांगलीच खिल्ली उडवत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि तोंडामध्ये घुसून नाही तर टक्कर मारून. तर अनेक युजर्सनी लाफिंग इमोजी कमेंट टाकली आहे. तर काही लोक शिल्पाच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts