HomeViralगावातील शेतकऱ्याने लढवली अशी शक्कल, कधीच कोणता प्राणी शेताची नासधूस करणार नाही....व्हिडीओ...

गावातील शेतकऱ्याने लढवली अशी शक्कल, कधीच कोणता प्राणी शेताची नासधूस करणार नाही….व्हिडीओ व्हायरल…

जसे कि तुम्हाला माहिती आहे कि जे लोक ग्रामीण भागाशी जोडले गेले आहे त्यांना माहिती आहे कि शेतकऱ्याना शेताची नासधूस होण्याची भीती असते. अनेकदा पक्षी, गायी-म्हशी इत्यादी प्राणी शेतामध्ये पिकांची नासाडी करतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. अशा स्थितीत शेतात दिवसभर उन्हात उभे राहणे शेतकऱ्यांना कठीण जाते. पूर्वी लोक माणसाचा पुतळा बनवून शेताच्या मधोमध उभा करायचे. मात्र, बराच काळ लोटल्यानंतरही त्याचा फारसा फायदा होत नाही अशामध्ये आता शेतकऱ्यांनी नवा देसी जुगाड केला आहे. पक्ष्यांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी शेतकऱ्याने नवीन स्वदेशी यंत्राचा वापर केला आहे.

पक्ष्यांनी शेतातील पिकांची नासाडी करू नये यासाठी शेतकऱ्याने अनोखे यंत्र वापरले आहे. हे उपकरण शेतात सतत आवाज करत राहते, त्यामुळे पक्षी दूर राहतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बाजरीच्या शेतात बसलेल्या पक्षांना हाकलण्यासाठी मशिनरी मोटरचा वापर केल्याचे दिसून येते. त्यात एक पंखा बसवण्यात आला आहे, जो वारा वाहू लागल्यावर आपोआप वाजू लागतो.

यासोबत पंख्याच्या खाली प्लेट नट आणि बोल्टच्या साहाय्याने उलटे करून बसवण्यात आली आहे. वाऱ्याच्या वेगाने पंखा फिरू लागला की पंख्यासोबत प्लेटला जोडलेला चमचा त्यावर वारंवार आपटू लागतो. ज्यामुळे मोठा आवाज येतो. हे ऐकून शेतात बसलेले पक्षी उडून जातात. या उपकरणात वीज किंवा बॅटरी वापरली जात नाही.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल. पक्ष्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी हा अनोखा मार्ग शोधला आहे. इंस्टाग्रामवर जुगाड लाईफ हॅक्स नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘पक्ष्यांना हाकलण्याचा सोपा मार्ग…’

 

View this post on Instagram

 

A post shared by JUGAAD (@jugaadu_life_hacks)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts