भारतीय संघाचा तिसरा स्टार यावर्षी विवाहबद्ध झाला आहे. प्रथम, केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे लग्न, त्यानंतर ऑलराउंडर अक्षर पटेल आणि मेहा यांचे लग्न चर्चेत आले. यानंतर आता शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुलकर हिला डेट केल्यानंतर तिच्यासोबत लग्न केले आहे.
३१ वर्षीय शार्दुलने मराठी रितीरिवाजानुसार लग्न केले. लग्नात शार्दुल आणि मिताली मराठी पारंपरिक पोशाखात पाहायला मिळाले. ठाकूर कुटुंब आणि मित्रांसोबत शार्दुल आणि मिताली नाचताना पाहायला मिळाले. शार्दुलचा हळदी सेरेमनी २५ फेब्रुवारी रोजी आणि संगीत सेरेमनी २६ फेब्रुवारीला रोजी झाला. यावेळी त्यांनी सैराट चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स केला.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा या सोहळ्याला उपस्थित होते. यादरम्यान शार्दुलचा सहकारी श्रेयस अय्यर डान्स करताना पाहायला मिळाला. कर्णधार रोहित आणि पत्नी रितिका सजदेहही लग्नाला पोहोचले. शार्दुलच्या संगीत सेरेमनीमध्ये रोहितनेही जबरदस्त डान्स केला.
२०२१ मध्ये शार्दुल ठाकूर आणि त्याची मैत्रीण मिताली परुलकर यांची एंगेजमेंट झाली होती. आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार, दोघेही २०२२ मध्ये टी-२० वर्ल्ड कपनंतर लग्न करणार होते. मिताली एक बिझनेसवुमन आहे. तिची ‘द बेक्स’ कंपनी मुंबई आणि ठाण्यात बेकरी वस्तूंचा पुरवठा करते. मितालीने २०२० मध्ये ‘ऑल द जॅझ – लक्झरी बेकर्स’ ही कंपनीही उघडली होती.
View this post on Instagram