भारतीय संघामधील युवा खेळाडू शार्दुल ठाकूरने नुकतेच लग्न केले आहे. २७ फेब्रुवारी रोजी त्याने त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुळकरसोबत विवाहगाठ बांधली. कर्जतमध्ये दोघांनी मराठी रितीरिवाजानुसार लग्न केले. लग्नानंतर त्याच दिवशी रात्री शार्दुल ठाकूरने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले होते, जे अजून देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान शार्दुल ठाकूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. लग्नानंतर उत्सुकता लागून राहिलेली असते ती म्हणजे उखाणा घेण्याची, अशामध्ये शार्दुल ठाकूरने देखील मराठीमध्ये उखाणा घेतला आहे ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
शार्दुलने पत्नी मितालीसाठी खास मराठीमध्ये उखाणा घेतला. त्याने आपल्या प्रोफेशनला जोडून मितालीची स्तुती करणारा उखाणा घेतला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तो उखाणा घेताना म्हणत आहे कि, बॉलिंग करतो क्वीक, रन पण धावतो क्वीक; मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक. उखाणा ऐकतच मितालीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळते. ज्यानंतर ती टाळ्या देखील वाजवताना पाहायला मिळाली.
मिताली परुळकर ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. शार्दुल आणि मिताली अनेक वर्षे एकमेकांना डेट केले होते. अखेर दोघे अनेक वर्षाच्या डेटिंगनंतर विवाह बंधनात अडकले आहेत.
क्या बात हैं @imShard 😁
अस्सल #AllRounder 😁😁😁@sunandanlele सर आवडला का 😉 pic.twitter.com/yw9osqVbpG— Bhaskar Ganekar (@BhaskarGanekar) March 1, 2023