टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकुरने त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत लग्न केले आहे. दोघांनी मुंबईमध्ये मराठी रीति-रिवाजानुसार सात फेरे घेतले. केएल राहुल आणि अक्षर पटेल नंतर या वर्षी लग्न करणारा शार्दुल ठाकूर तिसरा भारतीय क्रिकेटर आहे. शार्दुल ठाकूर आणि मिताली पारुलकरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
शार्दुल-मितालीचे लग्न धुमधडाक्यात झाले. लग्नाच्या पहिला संगीत सेरेमनी आणि हळदी सेरेमनीचे देखील आयोजन केले होते. यासंबंधी फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यरदेखील लग्नाला हजर होते. इतकेच नाही तर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि मुंबई टीमचा स्थानीय सिद्धेश लाड यांनी देखील हजेर लावली होती.
रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेहने संगीत सेरेमनीमध्ये हजेरी लावली. तर श्रेयस अय्यर आणि युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने हळदी सेरेमनीमध्ये भाग घेतला. शार्दुल ठाकुर आणि मिताली पारुलकर यांनी संगीत सेरेमनीच्या अगोदर पूल पार्टीदेखील केली. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य सदस्यांसोबत दोघांनी खूप मस्ती केली.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram