१९९७ मध्ये आलेला जेपी दत्ता चा चित्रपट ‘बॉर्डर’ ने बॉक्सऑफिस वर अनेक रेकोर्ड तोडले होते. भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धावर बनवलेल्या या चित्रपटामध्ये सनी देओल, जॉकी श्रॉफ, सुनील शेट्टी, राखी गुलजार आणि अक्षय खन्ना हे प्रमुख भूमिकेमध्ये होते. या चित्रपटामध्ये पूजा भट्ट आणि तब्बू देखील होत्या परंतु त्यांना पडद्यावर जास्त स्पेस मिळाला नाही. तर, भैरो सिंह ची भूमिका साकारणारा सुनील शेट्टी च्या पत्नी च्या भूमिकेत शरबानी मुखर्जी दिसली. निळ्या डोळ्यातील ती मुलगी आणि सुनील शेट्टी यांच्यावर चित्रित केले गाणे ‘ए जाते हुये लम्हो…’ आज देखील लोकांच्या मुखात आहे.
शरबानी मुखर्जी चित्रपट घराण्यातील आहे. तिचा जन्म १९६९ मध्ये झाला होता. सुंदर डोळे असणारी शरबानी ने बॉलीवूड सुरुवात ही बालकलाकार म्हणून चित्रपट ‘हैवान’ मधून केली होती. तथापि, बहुतांश लोक तिला चित्रपट ‘बॉर्डर’ मुळेच लक्षात ठेवतात. शरबानी मुखर्जी प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या नात्यातील चुलत बहिण आहे. त्यांची आजी सतीराणी देवी अशोक कुमार – किशोर कुमार यांची बहिण होती. चित्रपट घराण्यातील असून देखील शरबानी बॉलीवूड मध्ये तिचा ठसा उमटवू शकली नाही.
शरबानी मुखर्जी ला युद्धावर आधारित खूप रोमांचक सीन आणि गाण्यासाठी आठवणीत ठेवले जाते. या चित्रपटामध्ये सुनील शेट्टी तिचा पती बनला होता ज्याला मधुचंद्राच्या रात्री कामावर परतण्याचा संदेश मिळतो. ‘…ऐ जाते हुए लम्हो जरा ठहरो जरा ठहरो’ मध्ये तिचा साधेपणा आणि निरागसपणा बघण्यासारखा होता. या चित्रपटाच्या नंतर तिने ‘मिठ्ठी’, ‘अंश’, ‘आंच’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तथापि तिला जास्त यशस्वी होता आले नाही.
बॉलीवूड मध्ये जास्त काम न मिळाल्यामुळे तिने भोजपुरी आणि मल्याळम सिनेमाकडे वाटचाल केली. भोजपुरी मध्ये तिचा चित्रपट ‘धरती कहे पुकार के’ खूपच ब्लॉकबस्टर झाला. शरबानी ने मल्याळम चित्रपटामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन सोबत देखील काम केले आहे. प्रियदर्शन चा दिग्दर्शक म्हणून ५० वा चित्रपट ‘राकीलीपट्टू’ मध्ये शरबानी ने प्रमुख भूमिका केली होती. आता शरबानी मोठ्या पडद्यापासून लांब आहे.
शरबानी ने पाकिस्तानी गायक शाजीया मंजूर च्या प्रसिद्ध गाण्यामुळे ‘घर आजा सोनिया’ साठी देखील प्रसिद्ध होती. या गाण्यामध्ये तिने ‘मूकबधीर’ मुलीची भूमिका साकारली होती. या गाण्यामध्ये समीर सोनी सोबत रोमान्स केला आहे. वर्ष २०१० मध्ये शरबानी ने ‘सुफी परंजा कथा’ नावाच्या एका कादंबरी वर आधारित चित्रपटामध्ये काम केले होते.
५४ वर्षांची झालेली शरबानी चा लुक आता खूप बदलला आहे. ती मागील २५ वर्षांपासून काय करत होती याची माहिती सध्या नाही. परंतु कायम ती दरवर्षी तिची बहिण काजोलच्या दुर्गा पूजा कार्यक्रमामध्ये हजर असते. यासोबतच तिची बहिण काजोल, राणी मुखर्जी आणि तनिशा तिच्या सोबत फोटो देखील शेअर करतात. चुलत बहिणीद्वारे शेअर केलेल्या फोटोंना पाहून असे समजते कि ती आता खूप बदलली आहे. त्याव्यतिरिक्त तिचं वैयक्तिक जीवनाशी संबंधित माहिती उपलब्ध नाही.