आलिया भट्ट च्या नंतर साउथ इंडियन अभिनेत्री शमना कासीम ने देखील लग्नाच्या तीन महिन्यानंतर गरोदर पणाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने आत्मविश्वासाने तिचा बेबी बंप फ्लोन्त करताना तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्रसिद्ध साउथ इंडियन अभिनेत्री शमना कासीम ने अलीकडे युट्युब विडीओ च्या माध्यमातून तिच्या प्रेग्नन्सी च्या बद्दल चाहत्यांना सांगितले आहे.
शमना चा हा विडीओ इंटरनेट वर खूप वायरल होताना दिसत आहे. अभिनेत्री शमना कासीम ने २४ डिसेंबर २०२२ ला व्यावसायिक शनिद आसिफ अली सोबत विवाह केला होता. विवाहानंतर तीन महिन्यानंतर अभिनेत्रीने फक्त प्रेग्नन्सी ची बातमीच दिली नाही तर बेबी बंप देखील दाखवला.
शमना कासीम च्या गरोदर पणाची बातमी समोर आल्या नंतर नेटीजंस खूपच चकित झाले आहेत परंतु चांगली गोष्ट हि आहे कि चकित होऊन देखील सर्वजण जोडीचे अभिनंदन करताना दिसत आहेत. शमना कासीम ने दुबई मध्ये ग्रेंड सेलिब्रेशन करत विवाह केला होता. शमना ने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर देखील शेअर केले होते.
शमना आणि तिचा पती शनिद यांच्या जोडीला नेटीजंस ने खूप प्रेम दिले होते. वर्ष २०२३ मध्ये शमना पहिली अभिनेत्री आहे जिने आपली स्वतः ची गरोदर असल्याची बातमी दिली आहे. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, बिपाशा बासू सोबत अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाळाचे आवाज येत आहेत
View this post on Instagram