HomeBollywoodशाहरुख खानला छ’क्का म्हणणाऱ्या ट्रोलरला किंग खानने दिले असे उत्तर, म्हणाला; ‘नाही...

शाहरुख खानला छ’क्का म्हणणाऱ्या ट्रोलरला किंग खानने दिले असे उत्तर, म्हणाला; ‘नाही मी तर…’

शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मोठ्या ब्रेकनंतर एकीकडे चाहते शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत तर दुसरीकडे चित्रपटाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान आता शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये शाहरुख खान ट्रोलरला चोख उत्तर देताना पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झालेला हा व्हिडीओ तसा तर खूप जुना आहे पण सध्या त्याबद्ल खूपच चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख जितेंद्र कुमार आणि निधीसोबत पाहायला मिळत आहे. दरम्यान व्हिडीओमध्ये ते फोनमध्ये पाहून लोकांच्या कमेंट वाचत असतात.

त्यांची नजर एका अशा कमेंटवर पडते ज्यानंतर निधी आणि जितेंद्र शांत होतात तर किंग खान ट्रोलरला सडेतोड उत्तर देतो. एका ट्रोलरने शाहरुख खानच्या एका फोटोवर कमेंट करत छक्का SRK असं लिहिलेलं शाहरुख वाचतो. ज्यानंतर शाहरुख असे उत्तर देतो कि ट्रोलरची बोलतीच बंद होते.

तो म्हणतो कि, मी इतका मोठा आहे कि चौका होऊच शकत नाही, आणि सिंगल रण देखील नाही, मी तर छक्काच मारणार. शाहरुखची हि स्टाईल चाहत्यांना खुच आवडलेली दिसतेय. नेटकरी त्याच्या या व्हिडीओवर कमेंट करून त्याच्या विनोदबुद्धीचं कौतुक करत आहेत.

सध्या शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा वाद चांगलाच उफाळला आहे. चित्रपटाच्या बेशरम रंग या पहिल्या गाण्यामधील दीपिका पदुकोणच्या बिकिनी रंगामुळे खूपच वाद झाला. सोशल मिडियावर या वादामुळे पठाण मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. पण सध्या असे दिसून येत आहे कि अशा वादामध्ये चित्रपटाच्या धमाकेदार रिलीजवर याचा काही परिणाम होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts