शाहरुख खान ची मैनेंजर पूजा ददलानी ने तिच्या इंस्टाग्राम अकौंट वर मुंबईतील तिच्या नवीन घरातील फोटो शेअर केले आहेत. गौरी खान ने या घराचे इंटिरियर सजवले आहे. शाहरुख स्वतः गुरुवारी पूजाचे नवीन घर पाहायला गेला होता. फोटो मध्ये पूजाच्या घरातील भव्य असे लिविंग रूम पाहायला मिळत आहे.
फोटो प्रमाणे, सुसज्ज असलेल्या जागेत अलिशान हिरवा सोफा, विंटेज लेम्प शेड असलेले लाकडी टेबल स्टेन्ड आणि इनडोअर झाडे आहेत. त्यामध्ये एक विशाल असे काचेचे झुंबर देखील आहे ज्याच्या मागे एक विशाल सौंदर्य आरसा आहे. पहिल्या फोटो मध्ये पूजा आणि गौरी सोफ्यावर सोबत पोज देताना दिसत आहे.
आणखी एका फोटो मध्ये दोघी आरश्या जवळ पोज देत आहेत तर दुसऱ्या एका मध्ये दोघी एकमेकींच्या सोबत बोलण्यात व्यस्त असलेले दिसत आहे. फोटोंना पोस्ट करत पूजाने लिहिले आहे कि, ‘माझ्या नवीन घरामध्ये पाय ठेवत आहे…आणि या नवीन प्रवासाला सुरुवात करण्याची यापेक्षा नवीन पद्धत काय असू शकते कि माझ्या कुटुंबाद्वारे डिजाईन केलेल्या घरामध्ये बदल केला आहे.
मनीष मल्होत्रा, संजय कपूर आणि मीरा राजपूत सह अन्य लोकांनी पूजाचे अभिनंदन करणारे मेसेज पाठवले आहेत. अशातच, शाहरुख त्याच्या कार मधून पूजा च्या घरी आलेला दिसला. रिपोर्टनुसार, हे शहरातील पूजाचे नवीन घर आहे. गौरी खान ने तिचा ब्रांड असलेल्या गौरी खान डिजाईन च्या माध्यमातून अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या घराचे डिजाईन केले आहे. यामध्ये अंबानी, बच्चन आणि फराह खान, करण जोहर, जैकलीन फर्नांडीस, आलिया भट्ट,सिद्धार्थ मल्होत्रा, कैतरिना कैफ, मलायका अरोरा, रणबीर कपूर आणि मनीष मल्होत्रा सारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.
View this post on Instagram