HomeBollywoodकरोडो रुपयांची शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅन आहे खूपच खास, पहा Inside Photos...

करोडो रुपयांची शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅन आहे खूपच खास, पहा Inside Photos…

बॉलीवूडचा किंग खान मोठ्या पडद्यावर जवळ जवळ ५ वर्षानंतर पठाण चित्रपटामधून परतला आहे. बॉलीवूड पासून ते सामान्य लोकांपर्यंत याच चित्रपटाच्या चर्चा होत आहेत. चित्रपटाबद्दल तुम्ही बरेच काही ऐकले असेल. आज आपण पठाण म्हणजेच शाहरुखच्या किंग साईज लाईफबद्दल जाणून घेणार आहोत. बॉलीवूडचा बादशाह SRK रियल लाईफमध्ये खूपच आलिशान लाईफ जगतो. त्याच्याजवळ करोडोचे बंगले आहेत त्याचबरोबर एक हायटेक व्हॅनिटी व्हॅन देखील आहे.

या व्हॅनची किंमत कोट्यवधी रुपये आहे. चला तर आपण फोटोंच्या माध्यमातून शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅन बद्दल जाणून घेऊया. शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅन Volvo BR9 एक चालता फिरता राजवाडा आहे. हि व्हॅन प्रसिद्ध ऑटोमोबाईल डिझायनर दिलीप छाब्रिया यांनी डिझाइन केली आहे.

या व्हॅनची किंमत सुमारे ४ करोड इतकी आहे. व्हॅनिटीमध्ये इलेक्ट्रिक खुर्ची आहे. जी कुठेही नेली जाऊ शकते. व्हॅनमध्ये एक वॉर्डरोब आणि मेकअप चेयर देखील आहे. सुपरस्टारच्या अंघोळीसाठी यामध्ये एक स्वयंचलित शॉवर देखील आहे. जिम करण्यासाठी त्यांच्या व्हॅनिटीमध्ये जिम एरियाही आहे.

यामध्ये शुटींगमधून ब्रेक दरम्यान SRK जिम करताना पाहायला मिळतो. व्हॅनिटीचा फ्लोर पूर्णपणे काचेने बनवण्यात आला आहे आणि यामध्ये एक बॅकलिट देखील आहे. याच्या छतावर वुडन पॅनल लावला गेला आहे. यामध्ये एक छोटा डाइनिंग एरिया देखील आहे.

व्हॅनमध्येमध्ये आलिशान स्पेस देण्यात आला आहे. पार्किंग केल्यानंतर याचे अनेक भाग एक्सटेंड केले जाऊ शकतात. वाय-फाय इतर तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या व्हॅनिटीमध्ये एक मोठा फ्लॅट टीव्हीही बसवण्यात आला आहे. त्याची फंक्शन्स आयपॅडच्या मदतीनेही नियंत्रित करता येतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts