HomeBollywoodपठाणच्या यशानंतर शाहरुख खानने खरेदी केली लक्झरी कार, किंमत जाणून होश उडतील,...

पठाणच्या यशानंतर शाहरुख खानने खरेदी केली लक्झरी कार, किंमत जाणून होश उडतील, कारचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल…

शाहरुख खान चार वर्षानंतर सिल्वर स्क्रीनवर परतल्यानंतर सध्या पठाणच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. तर दुसरीकडे देखील त्याच्या अपकमिंग डंकी आणि जवान चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. यादरम्यान अभिनेता शाहरुख खानने स्वतःला एक खास गिफ्ट दिले आहे. जे लाखोंचे नाही तर करोडोंचे आहे. वास्तविक रविवारी संध्याकाळी रोल्स-रॉईस कलिनन ब्लॅक या महागड्या कारसोबत अभिनेत्याला स्पॉट केले गेले ज्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

माहितीनुसास्र शाहरुख खान द्वारे खरेदी केलेली कार सध्या भारतामध्ये विकली जाणारी सर्वात महागडी एसयूवी आहे. या कारची शोरूम किंमत ८.२० करोड रुपये इतकी आहे. एकूण किंमत पाहायला गेली तर ती १० करोडच्या आसपास आहे. तर सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुखची ५५५ नंबर प्लेटची व्हाईट कार मन्नतमध्ये जाताना दिसत आहे.

हे पहिल्यांदाच नाहीत कि शाहरुख खानला लक्झरी वस्तूंसोबत स्पॉट केले गेले आहे. याआधी अभिनेत्याला एका इवेंटमध्ये जवळ जवळ ५ करोडच्या घड्याळासोबत स्पॉट केले गेले होते. तर चाहत्यांनी या घड्याळाच्या किंमतीवर सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिल्या होत्या.

शाहरुख खानचा पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० करोड पेक्षा जास्त कमाई केली आहे. तर चित्रपट अजून देखील चित्रपटगृहांमध्ये कमाई करत आहे. तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील हा चित्रपट डिलीट सीन्ससोबत रिलीज झाला आहे. शाहरुख खानशिवाय सिद्धार्थ आनंद द्वारा दिग्दर्शित पठाणमध्ये दीपिका पदुकोन आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

तर डिम्पल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील काम केले आहे. यामध्ये सलमान खानचा टायगरच्या भूमिकेमध्ये कॅमियो देखील आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान एटली कुमारच्या जवान आणि राजकुमार हिरानीच्या डंकीमध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय सलमान खानच्या टायगर ३ मध्ये देखील त्याचा एक कॅमियो असणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts