HomeBollywoodप्रसिद्ध गायिका गंभीर आजाराची शिकार, वेदना व्यक्त करत म्हणाली; ‘आता मी कधीच...

प्रसिद्ध गायिका गंभीर आजाराची शिकार, वेदना व्यक्त करत म्हणाली; ‘आता मी कधीच आई…’

प्रसिद्ध अमेरिकन गायिका सेलेना गोमेज अलीकडे खूपच चर्चेत आलेली आहे. सेलेना गोमेज चे चर्चेत येण्याचे कारण तिचे गाणे नाहीत तर तिचे आजारपण आहे. सेलेना गोमेज ने अलीकडे तिचा एक नवीन माहितीपट ‘माई माइंड एंड मी’ मध्ये तिच्या आजारपणाबद्दल मोकळ्या पणाने सांगितले आहे.

सेलेना गोमेज ने तसे तर २०२० मध्येच एका इंस्टाग्राम लाइव मध्ये तिच्या या आजारपणाची मोकळ्या पणाने माहिती दिली आहे. परंतु यावेळी तिने सर्व माहिती दिलेली आहे. सेलेना ने सांगितले की, ती बायपोलर डीसऑर्डर ची शिकार झाली आहे.

माहितीनुसार सेलेना गोमेज ने एका मेगेजीन च्या कवर पेज च्या उद्घाटन प्रसंगी तिच्या भविष्याबद्दल सांगितले होते. ज्यामध्ये तिने आई बनण्याची तिची इच्छा व्यक्त केली होती. माहितीनुसार सेलेना ने हे सांगितले होते की तिला कुटुंब वाढवणे आवडते परंतु या औषधांच्या कारणामुळे हे खूपच धोकादायक ठरू शकते.

सेलेना ने हे देखील सांगितले की तिने एकदा प्रेग्नन्सी साठी प्रयत्न करत असलेल्या तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेली होती, तिथे तिने तिच्या मैत्रिणीला पाहिल्यानंतर तिच्या गाडीत जावून खूप रडू लागली. सेलेना गोमेज ला असे वाटत होते की ती कधीही आई बनू शकणार नाही.

सेलेना गोमेज एक पॉप गायिका आहे. ती तिच्या गाण्यांमुळे पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. अमेरीकन गायिकेने अलीकडेच एप्पल टीवी वर एक माहितीपट प्रसिद्ध केला आहे ज्याचे नाव ‘माई माइंड एंड मी’ आहे. या माहितीपटा मध्ये सेलेना गोमेज ने मानसिक आरोग्या ला घेऊन खूप काही सांगितले आहे आणि तिच्या जीवनात आलेल्या चढउतार देखील सांगितले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Selena Gomez (@selenagomez)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts