साऊथचा सुपरस्टार राम चरण आपला ३८ वा बर्थडे साजरा करत आहे. २७ मार्च १९८५ रोजी जन्मलेल्या राम चरणने प्रसिद्धी-संपत्ती खूप कमवली आहे. प्रत्येकजण राम चरण च्या लुक्स पासून ते अभिनयापर्यंत दिवाना आहे. राम चरणची एक झलक मिळवण्यासाठी चाहते आतुर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का कि राम चरणने जेव्हा पहिली ऑडिशन दिली होती तेव्हा तो कसा दिसत होता.
राम चरणच्या बर्थडेच्या निमित्ताने आपण त्याचा हा व्हिडीओ पाहणार आहोत जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही राम चरणला ओळखू देखील शकणार नाही. हि ऑडिशन तेव्हाची आहे जेव्हा राम चरण मुंबईच्या एका अभिनय शाळेत शिकत होता.
View this post on Instagram
राम चरणला या व्हिडीओमध्ये जरादेखील ओळखता येत नाही. त्याचा लुक, स्टाईल आणि अंदाज खूपच वेगळा आहे. लांब केस, सडपातळ शरीर, राम चरणने हि ऑडिशन अभिनेत्री श्रिया सरन सोबत दिली होती आणि दोन्ही कलाकार आज साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहेत. श्रिया दृश्यम आणि दृश्यम २ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये खूपच चर्चेमध्ये आहे. या ऑडिशनला पाहून असे म्हंटले जाऊ शकते कि राम चरणला अभिनयाचा जणू वारसाच मिळाला आहे.
भलेही राम चरण सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब फिल्मी कलाकारांनी भरलेले आहे पण त्याने एक वेगळी ओळख बनवली आहे. आज राम चरण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. ऑस्करमधील आरआरआरच्या कामगिरीनंतर आता राम चरण जगभारामध्ये ओळखला जाऊ लागला आहे.
राम चरणने २००७ मध्ये पुरी जगन्नाथच्या चीरुथा चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. चित्रपटामधील राम चरणच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यानंतर राम चरणने एसएस राजामौलीच्या मगधीरा चित्रपटामध्ये काम केले. या चित्रपटामधून त्याला खरी ओळख मिळाली. राम चरण आता लवकरच सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटामधील एका गाण्यामध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय त्याच्या जवळ RC१५ देखील आहे ज्यामध्ये कियारा अडवाणी देखील आहे.