तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी नुकताच मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला आहे. विशाल कृष्ण रेड्डी जेव्हा मार्क अँटोनी चित्रपटाची शुटींग करत होता तेव्हा सेटवर एक मोठा अपघात झाला. जे झाले ते पाहून विशाल देखील हादरला आणि आता तो देवाचे आभार मानत आहे. विशालने या भयंक घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर केला आहे.
वास्तविक विशाल कृष्णा रेड्डी मार्क अँटोनी चित्रपटाची शुटींग करत होता. सेटवर कास्ट आणि क्रू सोबत खूप गर्दी होती. एक महत्वाचा सीक्वे न्स् शूट केला जात होता. सीक्वेंसमध्ये ट्रकचा देखील वापर केला जात होता. पण अचानकच ट्रकचा ताबा सुटला आणि स्पीडने तसाच पुढे आला. जिथे ज्युनियर आर्टिस्ट आपल्या शॉटसाठी तयार होते तर सोबत विशाल देखील होता.
सीननुसार ट्रकला एक भिंत फोडून निघाल्यानंतर थांबायला हवे होते पण ट्रकचा ताबा सुटला आणि तो न थांबता तसाच पुढे आला. तथापि ट्रक लवकर दिसला आणि सर्वजण बाजूला हटले. पण विशाल विशाल वेगाने येत असलेल्या ट्रकपासून अवघ्या काही अंतराने वाचला, जे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. अस म्हंटले जात आहे कि ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला होता ज्यामुळे ट्रकचा ताबा सुटला.
विशाल कृष्ण रेड्डीने या घटनेचा व्हिडीओ ट्विटर हँडलवरून शेयर केला आहे आणि लिहिले आहे कि अवघ्या काही सेकंद आणि काही इंचाच्या अंतराने माझा जीव वाचला, मी देवाचे आभार मानतो. या घटनेमुळे मी सुन्न झालो आहे. तथापि आता मी ठीक आहे आणि शुटींगवर परतलो आहे.
Jus missed my life in a matter of few seconds and few inches, Thanks to the Almighty
Numb to this incident back on my feet and back to shoot, GB pic.twitter.com/bL7sbc9dOu
— Vishal (@VishalKOfficial) February 22, 2023