आपले जीवन संपुष्टात आणणे एवढे सोपे नाही. कधी कधी माणूस आतून इतका तुटलेला असतो कि त्याच्या नियंत्रणात काहीही रहात नाही तो सर्व धैर्य आणि जगण्याची हिम्मत गमावतो. नुकतेच तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाची आग अजून शांत झाली नाही आणि आता बातमी आली आहे कि आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. बातमी आहे ती टॉलीवूड अभिनेता सुधीर वर्मा ने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे परंतु मृत्यूचे कारण अजून समजलेले नाही.
जी माहिती मिळाली आहे त्यानुसार सुधीर वर्मा ने त्याच्या विशाखापट्टणम येथील घरी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूची पुष्टी करताना त्याच्या सहकलाकाराने लिहिले – इतकी प्रेमळ व्यक्ती…तुमच्या सोबत काम करून चांगले वाटले. विश्वास बसत नाही कि तुम्ही आता या जगात नाही आहात.
सध्यातरी त्यांनी एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला याची चौकशी चालु आहे परंतु सांगितले जाते कि मागील काही दिवसांपासून तो मानसिकदृष्ट्या काहीश्या दडपशाहीला तोंड देत होता. मात्र त्या दबावाचे आणि तणावाचे कारण काय होते, हि माहिती मिळाली नाही.
सुधीर वर्मा यांच्या करिअर बद्दल पाहाल तर त्यांनी साल २०१३ मध्ये अभिनय क्षेत्रात पाउल ठेवले होते. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते – स्वामी रा रा. मात्र त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली ती २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कुंडनापु बोम्मा’ मधून. या चित्रपटाने त्यांना प्रकाशझोतात आणले. परंतु एवढे असून देखील त्यांच्या करिअर ची गाडी हळूवार चालू होती. रिपोर्टनुसार त्यांना चांगल्या ऑफर्स देखील मिळत नव्हत्या आणि त्यामुळे तो तणावाखाली असावा. परंतु आत्महत्येचे खरे कारण हे चौकशीनंतरच समजेल.
Sudheer! @sudheervarmak Such a lovely and warm guy’ It was great knowing you and working with you brother! Can’t digest the fact that you are no more! Om Shanti!🙏🙏🙏 @iChandiniC @vara_mullapudi @anil_anilbhanu pic.twitter.com/Sw7KdTRkpG
— Sudhakar Komakula (@UrsSudhakarK) January 23, 2023