मल्याळम फिल्म आणि टीव्ही अभिनेता केएस प्रेमकुमारचे शनिवारी वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले आहे. केएस प्रेमकुमारला मल्याळम फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रेमन या नावाने ओळखले जात होते. त्यांनी एक नाटक कलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. याशिवाय त्यांनी मल्याळमच्या अनेक सिरियल्समध्ये देखील काम केले.
माहितीनुसार प्रेमकुमार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर एका प्राई व्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि विरोधी पक्ष नेता वी डी सतीसन सहित मल्याळम फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी दुख व्यक्त केले आहे.
प्रेमन यांनी २५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. ते आपल्या कॉमेडी भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांना गुरु (१९९७), थेनकासिपत्तनम (२०००), पप्पी अप्पाचा (२०१०) आणि लीला (२०१६) सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामासाठी ओळखले जात होते. ते ओरु पप्पदावदा प्रेमम (२०२१) या चित्रपटामध्ये शेवटचे पाहायला मिळाले होते.
मुख्यमंत्री पिनाराई विजयनने प्रेमन यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हंटले कि ते असे अभिनेता होते ज्यांनी विनोदी आणि सिरीयस दोन्ही प्रकारच्या भूमिका सहजपणे केल्या. त्यांनी अशा भूमिका देखील केल्या ज्यांना राष्ट्रीय ओळख मिळाली.
त्यांनी म्हंटले कि त्यांचे हास्य, चेहऱ्यावरील खास भाव आणि त्यांचे हावभाव मल्याळी दर्शकांच्या मनामध्ये एक विशेष स्थान ठेवतील. प्रेमन यांनी ज्याप्रकारे अभिनय केला, त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या भूमिकांना देखील वेगळे दाखवण्याची क्षमता होती. सतीशन यांनी म्हंटले कि मल्याळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांची जागा कोणीच भरून काढू शकणार नाही.