HomeBollywoodदोन लग्नं, तीन अफेयर नंतर देखील एकटाच राहतोय ‘हा’ अभिनेता, स्वतःच्या मुलीच्या...

दोन लग्नं, तीन अफेयर नंतर देखील एकटाच राहतोय ‘हा’ अभिनेता, स्वतःच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत देखील राहिला होता लिव-इनमध्ये…

साऊथचा दिग्गज अभिनेता कमल हसन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. ७ नोव्हेंबर १९५४ रोजी जन्मलेला कमल हसनन आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो. तो साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार आहे आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्याने आपली छाप सोडली आहे.

कमल हसन एक उत्कृष्ट अभिनेता तर आहेच त्याचबरोबर तो दिग्दर्शक, स्क्रीनराइटर, प्रोड्यूसर, प्लेबॅक सिंगर देखील आहे. कमल हसनने बाल कलाकार म्हणून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. १९७५ मध्ये त्याने अपूर्वा रागांगल चित्रपटामधून डेब्यू केला होता. कमल हसन चित्रपट आणि अभिनयाशिवाय आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत राहिला. रंजक बाब हि आहे कि कमल हसनने दोन लग्नं केली आहेत, त्यानंतर देखील तो सिंगल आहे. कमल हसनचे दोन्ही लग्नं असफल राहिले आणि घटस्फोट झाला.

माहितीनुसार कमल हसनच्या लाईफमध्ये आतापर्यंत पाच महिला आल्या. कमल हसनने १९७० च्या दशकामध्ये अभिनेत्री श्रीविद्यासोबत काही चित्रपटांमध्ये काम केले होते. यादरम्यान कमल हसन आणि श्रीविद्याच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. तथापि दोघांचे नाते जास्त दिवस टिकले नाही. यानंतर कमल हसनने १९७८ मध्ये वाणी गणपतिसोबत लग्न केले आणि १० वर्षानंतर दोघे वेगळे झाले.

वाणीसोबत घटस्फोटानंतर कमल हसनचे नाव अभिनेत्री सारिकासोबत जोडले गेले. माहितीनुसार लग्नाच्या अगोदरच दोघे मुलगी श्रुती हसनचे आईवडील बनले. यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर कमल हसन आणि सारिकाच्या घरी मुलगी अक्षर हसनने जन्म घेतला. कमल हसन आणि सारिकाचे नाते देखील फार दिवस टिकले नाही आणि २००४ मध्ये दोघे वेगळे झाले.

लग्नाशिवाय कमल हसन आपल्या अफेयर्समुळे देखील चर्चेत राहिला. स्वतःच्या मुलीच्या वयाची अभिनेत्री सिमरन बग्गासोबत देखील त्याचे नाव जोडले गेले. नंतर अशी बातमी आली होती कि सिमरन बग्गा आपल्या एका मित्रासोबत लग्न केले. याशिवाय कमल हसन १३ वर्षापर्यंत अभिनेत्री गौतमी सोबत लिव इनमध्ये राहिला आणि नंतर दोघे २०१६ मध्ये वेगळे झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts