HomeBollywoodराम सेतूमध्ये अक्षय कुमारसोबत दिसलेला हा अभिनेता आहे साऊथचा सुपरस्टार, अनेक मोठ्या...

राम सेतूमध्ये अक्षय कुमारसोबत दिसलेला हा अभिनेता आहे साऊथचा सुपरस्टार, अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये केले आहे काम…

कधी काळी टीव्ही कलाकारांना कोल्ड रिस्पॉन्स देणाऱ्या बॉलीवूडने आता साऊथ स्टार्स आणि त्यांच्या चित्रपटांना वेलकम केले आहे. स्टारकिड्सला लॉन्च करणारा करण जोहर आता साऊथ स्टार्सवर देखील मेहेरबान झालेला पाहायला मिळतो. बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीचे हे मिलाप सुंदर तर आहेच पण एक गोष्ट आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल.

कारण साऊथ स्टार्स जे पहिला हिंदी चित्रपटांमध्ये चॉइस म्हणून दिसायचे आता कुठेना कुठे आव्हान बनत आहेत. छोटा रोल असो किंवा कॅमियो अपीयरेंस बॉलीवूड स्टार्सवर अभिनय फॅन्डम आणि स्क्रीन प्रेझेन्सबद्दल साऊथ कलाकार भारी पडताना दिसत आहे. आता नुकतेच रिलीज झालेल्या राम सेतू चित्रपटामध्ये दिसलेला तेलगु स्टार सत्यदेव कांचराना त्याचे एक उदाहरण हे. जर तुम्ही राम सेतू पाहिला असेल तर तुम्ही सत्यदेव कांचरानाच्या अभिनयाचे नक्कीच कौतुक कराल.

जितक्या सहजतने त्याने आपली भूमिका केली आहे कि ती कौतुकास्पद आहे. अक्षय कुमार चित्रपटाचा प्लस फॅक्टर आहे आणि त्याने आपली भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटाची लीडिंग लेडीज नुसरत भरुचा आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा काही खास रोल नव्हत. अक्षयनंतर आता सत्यदेव कांचरानाचा अभिनय कौतुकास्पद वाटला.

सत्यदेव कांचराना खासकरून तेलगु चित्रपटांमध्ये काम करतो. त्याने आपल्या करियरची सुरुवात सपोर्टिंग रोल्स पासून केली होती. हळू हळू तो मुख्य अभिनेता बनला. ज्योती लक्ष्मी मन ओरी रामायणम, ब्लफ मास्टर, ब्रोचेवरेवरुरा, उमा महेश्वरा उग्र रूपस्य सारख्या चित्रपटांमधील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले.

अभिनेत्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव मिस्टर परफेक्ट आहे. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि सत्यदेव हिंदी चित्रपट द गाझी अटॅकमध्ये देखील दिसला होता. राम सेतू त्याचा डेब्यू चित्रपट नाही. सत्यदेवने इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याचे लग्न झाले आहे. २०२० मध्ये त्याला मुलगा झाला होता.

तसे तर सत्यदेव पहिला साऊथ स्टार नाही ज्याने आपल्या दमदार अभिनयाने हिंदी दर्शकांचे मन जिंकले आहे. अल्लू अर्जुन, राम चरण, यश, प्रभास, विजय देवरकोंडा सारखे अनेक कलाकार आहेत जे हिंदी दर्शकांची पहिली पसंद बनत चालले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts