नुकतेच सतीश कौशिक यांचे निधन झाले होते, ज्याचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या खास मित्रांनी त्यांना सोशल मिडियाद्वारे श्रद्धांजलि दिली होती. पण या प्रकरणामध्ये पोलिसांना गुरुग्राममध्ये झालेल्या होळी पार्टीमध्ये काही आक्षेपार्ह औषधांची पाकिटे सापडली, ज्यामुळे सतीश कौशिक यांचा मित्र विकास मल्लूवर सोशल मिडियावर आरोप लावले जाऊ लागले. पण आता त्याने एक व्हिडीओ शेयर केला आहे, जो होळी पार्टीचा आहे, ज्यामध्ये ते सामील झाले होते.
सतीश कौशिकच्या निधन प्रकरणामध्ये पोलीस चौकशी करत आहेत. यादरम्यान आपल्यावर लागलेल्या आरोपांनंतर विकास मल्लूने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. ज्यामध्ये सतीश कौशिक डांस करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
विकास मल्लूने व्हिडीओ शेयर करत लिहिले आहे कि मला मौन सोडायचे आहे आणि सांगायचे आहे कि, एक ट्रॅजडी नेहमी अचानक घडते आणि त्याला थांबवण्याची ताकद कोणामध्ये नसते. यासोबत मी मिडियाच्या सदस्यांना विनंती करतो कि सर्वांच्या भावनांचा सम्मान करा. येणाऱ्या खास प्रसंगी सतीशजीची कमी नेहमी जाणवेल.
सतीश कौशिकचे मॅनेजर संतोषने पोलिसांना सांगितले आहे कि ८ मार्चला त्यांनी दुपारी ३ वाजता होळी साजरी केली आणि त्यानंतर आराम केला. जवळजवळ १२ वाजता मॅनेजरला बोलावले ज्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
View this post on Instagram