बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये होळी उत्सवादरम्यान एक वाईट बातमी आली कि अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सतीश कौशिक यांनी ९ मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. तर त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच ८ मार्च रोजी त्यांनी इंडस्ट्रीतील लोकांसोबत जोरदार होळी खेळली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
सतीश कौशिक यांचे अशाप्रकारे जाणे फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांचा जुना रॅप व्हिडिओ व्हायरल होत आहे. सतीश कौशिक यांनी २०२० च्या ऑक्टोबरमध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला होता.
सध्या हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये पाहू शकता कि ते रॅप करताना दिसत आहेत. सतीश कौशिक यांनी राज कुमार राव आणि नुसरत भरूचाचा छलांग चित्रपटामधील ‘तू ता साड़ी केयर नी करदा, टाइम स्पेयर नी करदा’ गाण्यावर रॅप केले होते. आता सतीश कौशिक यांचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहे आहे. त्यांच्या या व्हिडीओला पाहून चाहते भावूक होत आहेत. राज कुमार राव आणि नुसरत भरूचाच्या छलांग चित्रपटामध्ये सतीश कौशिक देखील पाहायला मिळाले होते.
सतीश कौशिक यांच्या अभिनय करियरबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी १९८३ मध्ये जाने भी दो यारों चित्रपटामधून करियरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सतीश कौशिक यांनी अभिनयासोबत दिग्दर्शन क्षेत्रामध्ये देखील हात अजमावला होता. सतीश कौशिक यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या कुटुंबामध्ये आता पत्नी आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाचा वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी मृत्यू झाला होता. सतीश कौशिक यांच्या मुलाचे निधन १९९६ मध्ये झाले होते. त्यांची मुलगी आता ११ वर्षाची आहे.
View this post on Instagram