HomeBollywoodसतीश कौशिकच्या निधनाच्या ११ दिवसांनंतर समोर आले पत्नी आणि मुलगी, अनुपम खेरचा...

सतीश कौशिकच्या निधनाच्या ११ दिवसांनंतर समोर आले पत्नी आणि मुलगी, अनुपम खेरचा हात पकडून भावूक झाली वंशिका…पहा व्हिडीओ…

सतीश कौशिकचे ८ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आज दिवंगत अभिनेत्यासाठी प्रार्थना सभा आणि पगडी समारंभ आयोजित केला होता. ज्यामध्ये इंडस्ट्रीमधील त्यांचे मित्र आणि अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. विद्या बालन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, डेविड धवन, जावेद अख्तर, बोनी कपूर आणि इतर अनेक कलाकार त्यांच्या घरी पाहायला मिळाली. यादरम्यान त्यांची मुलगी आणि पत्नी देखील पाहायला मिळाले जे एकदम असहाय्य दिसत होते.

वडील सतीश कौशिकच्या प्रेयर मीट मध्ये मुलगी वंशिका आणि त्यांची पत्नी रडताना पाहायला मिळाल्या. दोघी त्यांच्या मृत्यूनंतर ११ दिवसांनी पाहायला मिळाल्या आणि अजून देखील त्यांची हालत गंभीर वाटत आहे. वंशिकाचा हात पकडून अनिपाम खेर त्यांच्यासोबत दिसले. वंशिकाला अशाप्रकारे पाहून लोक व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये भावूक होत आहेत आणि त्यांना हिंमत देत आहेत.

काही दिवसांपूर्वी वंशिकाने सतीशसोबत आपला एक जुना फोटो पोस्ट केला होता. वडील आणि मुलगी एकमेकांना मिठी मारत होते आणि दोघे कॅमेऱ्यामध्ये हसत होते. वंशिकाने पोस्टला कॅप्शन दिले नाही आणि इंस्टाग्राम वर लाल दिवा वाला एक इमोजी जोडला होता. अभिनेत्याच्या चाहत्यांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये वंशिका आणि सतीशच्या कुटुंबाप्रती संदेश पाठवले होते.

सतीश आणि त्यांची पत्नी शशी कौशिक यांचे लग्न १९८५ मध्ये झाले होते. त्यांचा दोन वर्षाचा मुलगा सानू कौशिकचे १९९६ मध्ये निधन झाले होते. ज्यानंतर दोघे पूर्णपणे खचले होते. नंतर त्यांची दुसरी मुलगी वंशिकाचा जन्म २०१२ मध्ये सरोगसीद्वारे झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts