HomeBollywood“बाबा प्लीज असे करू नका”, लहानपणी सैफ अली खानची हि वागणूक खूपच...

“बाबा प्लीज असे करू नका”, लहानपणी सैफ अली खानची हि वागणूक खूपच किळसवाणी वाटायची…

बॉलीवूड चे मोठे अभिनेता सैफ अली खान या दिवसांत आपल्या येणारी पिक्चर भूत पुलिस च्या जाहिरातीत व्यस्त आहे. या पिक्चर मध्ये त्यांच्या सोबत अर्जुन कपूर, जैकलीन फर्नांडीस आणि यामी गौतम यांसारखे कलाकार पाहायला भेटणार आहेत. या पिक्चर ला ओटीटी प्लेटफार्म डिज्नी प्लस हॉटस्टार वर १० सप्टेंबर २०२१ ला प्रदर्शित झाला होता. आता पिक्चरची पूर्ण कास्ट याच्या जाहिरातीमध्ये लागली आहे. अशातच पिक्चरची कास्ट कॉमेडी नाइट विथ कपिलच्या शो मध्ये पण गेले होते, ज्याचा भाग या आठवड्याच्या शेवटी प्रसारित होणार आहे.

या शो मध्ये सैफ अली खान ने आपल्या वैयक्तिक पासून व्यावसायिक जीवनासंबंधी खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली. शो मध्ये अर्चना पुरण सिंह सैफ अली खान ला विचारतात की त्यांच्या मुलांना कोणती बालगीते सर्वात जास्त आवडतात. सैफ अर्चनाच्या या प्रश्नावर उत्तर देताना सांगतो की आता तर सर्व गाणे एलेक्सा गाते.

त्यासोबतच सैफ अली खान एक मजेशीर गोष्ट सांगतात.मी एक समरटाइम नावाची इंग्लिश बालगीत आहे ते म्हणायचो. तेंव्हा सारा खूपच लहान होती. तिने डोळे उघडून सांगितले ‘पप्पा प्लीज गाऊ नका’ त्यानंतर मी गाऊ नाही शकलो. मुले सुद्धा सांगतात की गाऊ नका.

आश्चर्याची गोष्ट ही आहे की कपिल शर्मा शो चा आत्ता आलेला प्रोमो विडीओ या वेळी सोशल मिडियावर खूपच वायरल होताना दिसत आहे. या प्रोमो विडीओ मध्ये होस्ट कपिल शर्मा सैफ अली खानला विचारतात की लॉकडाऊन मध्ये कसे होता काय काय केले? यावर सैफ अली खानने उत्तर देताना सांगितले की पहिल्या लॉकडाऊन मध्ये फ्रेंच आणि जेवण बनवायला शिकलो आणि दुसर्या लॉकडाऊन मध्ये बाळ. ज्याला ऐकून कपिल शर्मा आणि बाकी सगळे लोक जोरजोरात हसू लागले.

सैफ अली खानच्या करिअर वर बोलायचेच झाले तर त्यांची पिक्चर भूत पुलिस ओटीटी प्लेटफार्म वर प्रदर्शित होत आहे. आणि सुरवातीलाच त्यांना चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तसेच या वर्षी फेब्रुवारी मध्ये सैफ अली खान आणि करीना यांच्या घरी दुसर्या मुलाचा जन्म झाला ज्याचे नाव जेह ठेवण्यात आले आहे.

तसेच कपिल शर्माच्या शो मध्ये भूत पुलिस च्या टीम व्यतिरिक्त वेगवेगळे बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू, उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल पण प्रमुख पाहुण्यांच्या स्वरुपात पाहायला भेटणार आहे. म्हणजे या विकेंड ला कपिल शर्मा शो खूपच मजेदार होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts