HomeBollywoodधक्कादायक ! चाहतीने सारा अली खानसोबत केलं असं कृत्य, अभिनेत्रीची झाली अशी...

धक्कादायक ! चाहतीने सारा अली खानसोबत केलं असं कृत्य, अभिनेत्रीची झाली अशी अवस्था…

सारा अली खान बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे चाहते तिची एक झलक मिळवण्यासाठी नेहमी आतुर असतात. पण आज जेव्हा सारा अली खान एयरपोर्टवर स्पॉट झाली तेव्हा चाहते आऊट ऑफ कंट्रोल झाले. पण हद तर तेव्हा झाली जेव्हा कोणीतरी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. हे पाहून सारा अली खान हैराण झाली आणि नंतर पापाराझींनाही आश्चर्याचा धक्का बसला. पण इतके होऊन देखील अभिनेत्रीने आपला संयम गमवला नाही आणि कसेतरी करून गाडीपर्यंत पोहोचली आणि एयरपोर्टवरून निघून गेली.

सारा अली खान आज मुंबईच्या एयरपोर्टवर पोहोचली होती जिथे ती शानदार लुकमध्ये पाहायला मिळाली. व्हाईट सूटवर गुलाबी ओढलीसोबत सारा अली खान खूपच सुंदर दिसत होती. पण लोकांची नजर जशी तिच्यावर पडली तर प्रत्येकजण तिला पाहून तिच्याकडे पळू लागला. सारा देखील हे पाहून घाबरली पण तिने स्वतःला सांभाळले. चाहत्यांनी सेल्फी घेण्याची मागणी केली, हात मिळवण्याच्या प्रयत्न केला तेव्हा अभिनेत्रीने नकार दिला नाही.

तेव्हा एका मुलीने तिला हात मिळवल्यानंतर सरांच्या गळ्याच्या ठिकाणी हात लावला ज्यामुळे अभिनेत्री हैराण झाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक देखील हैराण झाले आहेत. आता युजर्स असे करणाऱ्यांना चांगलेच निशाण्यावर घेत आहेत.

त्याचबरोबर साराने संयम ठेवल्यामुळे युजर्स तिचे कौतुक करत आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री करीना कपूरसोबत देखील असे झाले होते जेव्हा ती एयरपोर्ट वर पोहोचली होती. गर्दीमध्ये तिची पर्स कोणीतरी ओढण्याचा प्रयत्न केला होता. तर दीपिका देखील अशा परिस्थितीची बळी पडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts