HomeBollywoodआई बनण्याच्या नादात अशी झाली 'या' अभिनेत्रीची हालत, पहिल्या नजरेमध्ये ओळखणे देखील...

आई बनण्याच्या नादात अशी झाली ‘या’ अभिनेत्रीची हालत, पहिल्या नजरेमध्ये ओळखणे देखील आहे कठीण…

बिग बॉस ची एक्स-स्पर्धक आणि अभिनेत्री नृत्यांगना संभावना सेठ ने सोशल मिडीयावर एक विडीओ शेअर केला आहे, ज्यात त्या आधीपेक्षा खूपच जाड दिसत आहेत आणि पहिल्या नजरेत त्यांना ओळखणे खूपच अवघड आहे. ४१ वयाची संभावनाने विडीओ मध्ये आपल्या या परिस्थितीचे खरे कारण सर्वांसमोर आणले आहे. त्या सांगत आहेत की,’मी आज तुम्हाला काही सांगू इच्छिते, आजकालच्या विडीओ मध्ये तुम्ही पाहिले असेल की मी सारखे अविनाशला बोलते की बेबी काय मी खूपच जाड दिसत आहे.

संभावना पुढे सांगते की, ‘मला माहिती आहे की मी खूपच जास्त जाड झाली आहे. मी स्वतःला खूप फिट तब्बेतीत पाहिले आहे, मी त्यावेळी खूपच आरामात डान्स करू शकत होते, आजपण सहज डान्स करू शकते पण तब्बेत तंदुरुस्त नाही. संभावना सांगते की, ‘माझ्या तब्बेतीच्या तक्रारी खूप असून, मला असं वाटते की मला स्वतःला आणि माझ्या चाहत्यांना हे समजणे खूप महत्वाचे आहे की आपले शरीर एक सारखे नाही राहू शकत. वेळेनुसार आरोग्य आणि वयानुसार सर्व काही बदलते. पण मला विश्वास आहे की, जे कायम रहायला आणि तो आत्मविश्वास तुम्हाला दुसरीकडेच घेऊन जातो.

संभावना सांगतात की, ‘मी खूपच आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाची आहे. आणि मला असे वाटते की आज मी खालच्या थराला आहे उद्या मी पुन्हा उठून पुढे जाणार. मी आत्मविश्वास कोणाकडून मागत नाही. कोणालाही विचारात नाही की मी कशी दिसते चांगली दिसते की नाही. मला माहित आहे की मी काहीही घातले, मी वाईट नाही दिसत. याच शरीरासोबत, याच वयात, याच चेहऱ्यासोबत आपण साजरा करायला पाहिजे. सर्वकाही होत राहते, पण सकारात्मक राहा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे खूप महत्वाचे आहे.

विडीओच्या कॅप्शन मध्ये संभावना लिहिते की, हे ऐका सर्वजण, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहायला हवे. हा होय, मी काही तब्बेतीच्या तक्रारी मधून गेलेली आहे, पण मी लवकरच यातून बाहेर पडेन. लोकांच्यासाठी वाईट बनू नका. कोणाला काहीही तक्रार असू शकते, सकारात्मक राहा.

संभावना सेठ ने २०१६ साली मित्र अविनाश द्विवेदी सोबत विवाह केला होता. त्यानंतर दोघे सारखे मुलांसाठी प्रयत्न करत होते परंतु ते त्यात यशस्वी होऊ शकले नाही. संभावना चार वेळा IVF चक्रातून सुद्धा गेली आहे. परंतु त्याचा सुद्धा त्यांना फायदा झाला नाही उलट आरोग्याशी संबधित तक्रारी आणि जास्त चालू झाल्या आणि त्यांचे वजन पण वाढले. संभावनाला बिग बॉस च्या सीजन ८ मध्ये स्पर्धक म्हणून पाहिले आहे. त्या खूप साऱ्या भोजपुरी पिक्चर मध्ये दिसल्या आहेत. आत्ता त्या युट्युब च्या माध्यमातून पैसे कमवत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts